राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ.सदानंद मोरे यांची नियुक्ती

मुंबई : प्रतिनिधी

राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मराठी भाषा विभागाच्या राज्य साहित्य व संस्कृती मंडळावरील अध्यक्ष व सदस्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. या मंडळाच्या अध्यक्ष पदी ज्येष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यासह अन्य ३५ नव्या सदस्यांची नियुक्तीही करण्यात आल्याचा शासन निर्णय आज बुधवारी जारी करण्यात आला.

विचारवंत डॉ.मोरे हे यापूर्वी पुणे विद्यापीठातील तत्वज्ञान विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकारच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या सारथी समितीच्या अध्यक्ष पदीही ते विराजमान होते. सारथी अहवाल सरकारला हवा तसा बनवून दिल्याबद्दल राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाची बक्षिसी त्यांना दिल्याची चर्चा साहित्य वर्तुळात सुरु झाली आहे.

डॉ. सदानंद मोरे यांच्यासह सदस्यपदी कलावंत गिरीष प्रभूणे, चित्रपट समिक्षक अशोक राणे, लेखक अरूण शेवते, भारत ससाणे, डॉ मार्तंड कुलकर्णी, सुनीलकुमार लवटे, संगीतकार संदीप खरे, आसाराम कसबे, ज्योतीराम कदम, उत्तम बंडू तुपे, रेणू पाचपोर, आशुतोष अडोणी, रवींद्र गोळे, श्रीमती सिसिलीया कार्व्हालो, उमा कुलकर्णी, सुप्रिया अय्यर, डॉ, विद्या पाटील, फरझाना डांगे, उषा परब, राणी दुर्वे, सुधीर पाठक, ए.के.शेख, विजय पाडळकर, जगन्नाथ शिंदे, अशोक सोनावणे, डॉ.रणधीर शिंदे, लखनसिंग कटारे, पत्रकार अरूण करमकर, शंकर धडके, संजय ढोले, देवीदास पोटे, रमेश पवार, डॉ.उत्तम रूद्रावतार, डॉ. मधुकर वाकोडे यांच्यासह ३५ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.     

About Editor

Check Also

डॉ बाबासाहेब आंबेडकरः आंबेडकरवादी विचारांचे सामाजिक प्रतिबिंब आणि सद्यस्थिती ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांच्या बारामती येथील राज्यस्तरीय राजकिय परिषदेतील भाषणाचा संपादित भाग

सर्वप्रथम आंबेडरवादी विचार काय आहेत हे समजून घेतले पाहिजे. अर्थात मर्यादित वेळेत जे मी मांडणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *