राज्य विधिमंडळाचे अधिवेशनाचा पहिलाच आठवडा आहे. आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आर्थिक सर्व्हेक्षण पाहणी अहवाल सादर करण्यात आला. मात्र तत्पूर्वीच सभागृहाचे कामकाज सुरु होताच भाजपाचे गटनेते प्रविण दरेकर यांनी अनिल परब यांच्या काल विधान परिषदेत केलेल्या वक्तव्याचा दाखला देत हरकत घेतली. तसेच संभाजी महाराज यांच्याशी अनिल परब यांनी स्वतःची तुलना केल्याचा आरोप करत याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी केली.
त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, अनिल परब यांनी स्वतःची तुलना संभाजी महाराज यांच्याशी केलेली नाही, मात्र त्यांच्यावर पक्ष बदलासाठी टाकण्यात आलेल्या दबावाबद्दल ते बोलत होते. तसे पाह्यलं तर त्यांच्या भाषणात काहीही चुकीचं नव्हतं. तरीही सभागृहाला वाटत असेल की त्यांनी बोलेले वक्तव्य किंवा त्यातील शब्द चुकिचा आहे तर त्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो.
त्यानंतर भाजपाचे मंत्री नितेश राणे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार म्हणून असताना जी काही कृत्ये केलीत त्याचा हा परिणाम आहे. एका केंद्रीय मंत्र्याला जेवणाच्या ताटावरून असताना अटक करण्यासाठी हेच फोन करत होते असा आरोप करत अनिल परब यांच्याकडे अंगुली निर्देश करत केला, तुम्ही कसले छळ सोसणारे, तुम्ही तर छळ करणारे असे म्हणत, कारकुनाचा कोणी छळ करत नसतो असा उपरोधिक टीकाही अनिल परब यांच्यावर केली.
त्यावर अनिल परब यांनी नितेश राणे यांचे नाव न घेता अनेक गोष्टींचे आरोप केले.
त्यावर विधान परिषदेत गदारोळ वाढल्याने विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांनी सभागृहाचे कामकाज पहिल्यांदा पाच मिनिटासाठी आणि नंतर १० मिनिटासाठी तहकूब केले.
शेवटी अनिल परब यांनी काल काय वक्तव्ये केले त्याविषयी बोलायला उठले, आणि सांगायला सुरूवात केली की, संभाजी महाराज हे माझे दैवत आहेत. त्यांच्या पायावर डोकं ठेवायला मला जराही लाज वाटणार नाही. मी काल विधान परिषदेत काय बोललो ते विधानसभा अध्यक्षांनी स्वतः काढून पहावे, त्यात जर काही आक्षेपार्ह असेल तर ते सभापती म्हणून काढून टाकावे, त्याचा पूर्ण अधिकार आपणास आहे. काल मी काय बोललो ते वक्तव्य मी विसरलेलो नाही. मी काय बोललो, धर्म बदलण्यासाठी संभाजी महाराजांचा ज्या पद्धतीने छळ केला त्याच पद्धतीने पक्ष बदलण्यासाठी माझाही छळ करण्यात आला. हेच वक्तत्य मी बोललो होतो. त्यात संभाजी महाराज यांच्याशी तुलना करण्यात आल्याचा मुद्दा आला कुठे असा सवाल करत इथे आलेल्या एका सदस्यामुळे इथले वातावरण बिघडले आहे. तो व्यक्ती जर इथे येऊन बोलला नसता तर इथे हा विषय निर्माण झाला नसता. केवळ न केवळ प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरचा विषय इथे सभागृहात येऊ नये म्हणून हे सगळं चालू असल्याचेही यावेळी सांगत ब्लॅक बॉक्स होल शब्द हा रूळलेला आणि त्यात आक्षेपार्ह काही नसेल तर सभापतींनी ते शब्द तपासून त्या ठिकाणी दुसरा शब्द वापरावा त्याचा अधिकार मी तुम्हाला दिलेला आहे. पण तो अधिकार यांना नाही तो अधिकार तुम्हाला आहे असे सांगत भाजपा सदस्यांवर टीका केली.
पुढे बोलताना अनिल परब म्हणाले की, त्यांच्या एका आमदाराने तर त्यांच्या कुत्र्याचे नाव शंभू म्हणून ठेवले आहे. त्यावर बोला, संभाजी महाराजांवर यांचे प्रेम आणि आशिर्वाद असल्याचे बोलतात. आणि कुत्र्याचे नाव शंभू ठेवतात असे सांगत त्या विषयीचे ट्विटही माझ्याकडे असल्याचे दावाही यावेळी केला. त्यावर नाव घ्या नाव घ्या असे आव्हान भाजपाच्या सदस्यांनी दिले. त्यावर अनिल परब यांनी भाजपा आमदार श्रीकांत भारतीय यांचे नाव घेत श्रीकांत भारतीय यांनी यासंदर्भात ट्विट केले होते त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. असे जाहिर करताच भाजपाचे आमदार बँकफूटवर गेल्याचे दिसून आले.
त्यावर भाजपाच्या सदस्यांनी आरडाओरडा करत गदारोळ घालण्याचा प्रयत्न केला. पण अनिल परब हे आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. त्यानंतर भाजपाचे प्रविण दरेकर यांनी अनिल परब यांचे आताचे वक्तव्य म्हणजे गुर्मीचे वक्तव्य असून त्यांच्या वक्तव्यातून संभाजी महाराज यांच्याशी तुलना केल्या बद्दल अनिल परब यांचा धिक्कारही केला.
अखेर या प्रकरणी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी रेकॉर्डवर जे काही चुकीचे गेले असेल ते पटलावरून टाकावे असे आदेश विधान परिषदेतील प्रशासना दिले.
Marathi e-Batmya