छावण्या बंद…लावण्या सुरु विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

मुंबई : प्रतिनिधी

छावण्या बंद… लावण्या सुरु… शेतकऱ्यांना मदत न करणार्‍या सरकारचा धिक्कार असो… मेगाभरती रद्द करणाऱ्या सरकारचा निषेध असो…छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम थांबणार्‍या सरकारचा धिक्कार असो… मोदी हटाव… देश बचाव… अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

अर्थसंकल्प अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधकांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार  जयंतराव पाटील, विधानसभेतील मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे, विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद आमदार हेमंत टकले, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार विक्रम काळे, आमदार विदया चव्हाण, आमदार विजय भांबळे, आमदार मधुसुदन केंद्रे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार श्रीमती संध्याताई कुपेकर, आमदार श्रीमती सुमनताई पाटील,आमदार राजेश टोपे, आमदार हसन मुश्रीफ, आमदार ज्योती कलानी, आमदार ख्वाजा बेग, आमदार प्रकाश गजभिये, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार दिलीप सोपल, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार वैभव पिचड आमदार प्रदीप नाईक आदींसह कॉंग्रेसचे आमदार उपस्थित होते.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *