आदित्य ठाकरे यांच्या चड्डी-बनियन गँगच्या उल्लेखावर निलेश राणे यांचे आव्हान हिंमत असेल तर नाव घेऊन बोला, उगाच मोघम बोलू नका

महाराष्ट्र विधानसभेत आज शिवसेना (उबाठा)चे आमदार आदित्य ठाकरे यांनी २९३ च्या प्रस्तावावर बोलत होते. यावेळी प्रस्तावावरील भाषण संपविताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचे अभिनंदन करत त्यांच्याकडून युतीचा धर्म पाळण्यात येत असून ज्या चड्डी-बनियनवर कारवाई करायला पाहिजे त्यांच्यावर कारवाई करता येत नाही. त्यामुळे त्यांचे खरेच आभार मानायला पाहिजे असे सांगत आपले भाषण संपविले. आदित्य ठाकरे यांनी त्यांचे भाषण संपवताच शिवसेनाओएफसीचे आमदार निलेश राणे यांनी चड्डी बनियन गँग वरून थेट आदित्य ठाकरे यांना आव्हान देत हिंमत असेल नाव घेऊन बोला, कोण आहे चड्डी आणि कोण आहे बनियन, दोन्ही काय संबध असा सवाल केला. तसेच सभागृहाच्या कामकाजातून हे दोन्ही शब्द काढून टाकण्याची मागणी केली. पण त्यावेळी सभागृहाचे तालिका अध्यक्ष समाधान आवताडे यांनी कोणताही निर्णय दिला नाही.

२९३ वरील प्रस्तावावरील भाषणात आदित्य ठाकरे यांनी धारावी आणि बीडीडी चाळ यांच्या पुनर्विकासावर भाष्य करताना म्हणाले की, “धारावीचे बीडीडी चाळ सारखे डेव्हलपमेंट करा, आमचा विरोध नाही. म्हाडा आणि एसआरएला पैसे मिळतील. कंत्राटदारांना प्रिमियम भरायला लावा, जागेचे पैसे सरकारला मिळाले पाहिजेत.” त्यांनी मुंबईत ७५० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर (प्रॉपर्टी टॅक्स) माफ करावा, बीएसटीच्या दुप्पट भाडेवाढीचा निर्णय रद्द करावा आणि ‘अदाणी टॅक्स’ रद्द करण्याची मागणी केली.

तसेच आदित्य ठाकरे यांनी नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनात दिलेले फ्री होल्ड कन्व्हर्जन चार्ज कमी करण्याचे आश्वासन पूर्ण न झाल्याचा मुद्दा उपस्थित करत म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायदा घ्यायचा असेल तर करा, पण सर्व यंत्रणा निवडणुकीत व्यस्त असतात, त्यामुळे लोकांचा फायदा होत नाही. तुमचे शंभर होर्डिंग लावा, आम्ही शंभर फुटांचे होर्डिंग लावू, पण हा चार्ज रद्द करा अशी मागणी केली.

आदित्य ठाकरे यांनी कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करताना उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर खोचक टीका केली. पण उपमुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या गटाचे नाव न घेता म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा युती धर्म पाळण्यासाठी मी त्यांच्यासोबत सहानुभूती व्यक्त करतो. ज्या लोकांसोबत ते बसले आहेत, ती ‘चड्डी बनियन गँग’ कुठे जाऊन काय करते, यावर कारवाई होत नाही. मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी खूप सहनशीलता दाखवली आहे, पण आता मुंबईकरांच्या मागण्या आणि ‘चड्डी बनियन गँग’वर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत मांडले आणि आपले भाषण संपविले.

त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार निलेश राणे यांनी लगेच उठून आदित्य ठाकरे यांनी वापरलेल्या चड्डी-बनियनचे शब्दावंरून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. तसेच हिंमत असेल तर नाव घेऊन बोला उगीच मोघम बोलू नका असे आव्हान आदित्य ठाकरे यांना उद्देशून केले.

आदित्य यांच्या ‘चड्डी बनियन गँग’ या उल्लेखावर निलेश राणे संतप्त झाले. त्यांनी सभागृहात जागेवरून उठून आपली भूमिका मांडली. राणे म्हणाले, “हे जे शब्द वापरले, नेमके कुणावर कारवाई व्हावी? त्यांची चड्डी कोण, बनियन कोण? हे त्यांनी स्पष्ट करावं. बोलायला भीती वाटत असेल तर सभागृहात असे शब्द वापरू नका. हे शब्द कोणासाठी होते, हिंमत असेल तर बोलून दाखवा.” त्यांनी पुढे मागणी केली की, हे शब्द सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकावेत किंवा आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट करावे की, ते कोणाबद्दल बोलत होते.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांचे निर्देश, उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा एसटी महामंडळाला दिले निर्देश

“बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *