परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी घेतली भेट चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिगपिंग यांची शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी डॉ एस जयशंकर चीन दौऱ्यावर

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि त्यांच्या शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांमधील समकक्षांनी मंगळवारी (१५ जुलै २०२५) चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली.

सोशल मीडिया पोस्टमध्ये डॉ एस जयशंकर म्हणाले की, भारत-चीन द्विपक्षीय संबंधांमधील अलिकडच्या विकासाबद्दल राष्ट्रपती शी जिगपिंग यांना माहिती दिली.

परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सोमवारी (१४ जुलै २०२५) शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत सहभागी होण्यासाठी दोन दिवसांच्या भेटीवर चीनमध्ये दाखल झाले. जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर द्विपक्षीय संबंधांमध्ये मोठी घसरण झाल्यानंतर हा त्यांचा पहिलाच चीन दौरा आहे.

परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर म्हणाले की, आज सकाळी माझ्या सहकारी शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांसह बीजिंगमध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली, असी माहिती ‘एक्स’ वर दिली.

तसेच डॉ एस जयशंकर म्हणाले की, “राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुभेच्छा संदेश दिले,” असेही सांगितले.
“राष्ट्रपती शी जिगपिंग यांना आमच्या द्विपक्षीय संबंधांच्या अलिकडच्या विकासाची माहिती दिली. त्या संदर्भात आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाचे कौतुक केले,” असे परराष्ट्र मंत्री म्हणाले.

About Editor

Check Also

भारत- ब्राझील दरम्यान होणार २० अब्जहून अधिकचा व्यापार द्विपक्षिय चर्चेत व्यापार वाढविण्याबाबत दोन्ही देशांचे एकमत

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नवी दिल्ली येथे ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इन्सियो लुला दा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *