आमदार अमित साटम यांची मुंबई भाजपा अध्यक्षपदी नियुक्ती पक्ष नेतृत्वाने विश्वास दाखवल्याबद्दल आणि संधी दिल्याबद्दल मानले आभार

बीएमसी निवडणुकीपूर्वी अंधेरी (पश्चिम) येथील भाजपा आमदार अमित साटम यांची मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईसाठी पक्षाचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे आमदार अमित साटम यांनी सांगितले.

आमदार अमित साटम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा जी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे त्यांच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आणि त्यांना इतकी महत्त्वाची जबाबदारी सोपवल्याबद्दल मनापासून आभार मानले.

आमदार अमित साटम म्हणाले की, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि गृहनिर्माणाबरोबरच, शहराची ओळख बदलण्याच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांच्या सुरक्षिततेलाही तितकेच महत्त्व दिले जाईल. मुंबईकरांची सुरक्षा आणि सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. मुंबईचा विकास होत असताना, आमचे लक्ष नागरिकांचे कल्याण आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यावर असेल. आम्ही बीएमसीवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी आणि बीएमसीमध्ये महायुतीचा महापौर बसवण्यासाठी काम करू, असे सांगितले.

पुढे बोलताना आमदार अमित साटम यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०१४ पासून झालेल्या प्रमुख पायाभूत सुविधा एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवल्याचे सांगत कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सीसीटीव्ही देखरेख आणि २०११ पर्यंत झोपडपट्टीवासीयांना घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तसेच अल्प कमी आणि मध्यम उत्पन्न गटासाठी घरे देण्यासाठी गृहनिर्माण सुधारणांचा समावेश आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासह, देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई परिवर्तनाच्या मार्गावर आहे अणि ते पुढे नेण्याचे काम आम्ही करू, असे आश्वासन दिले.

शेवटी बोलताना अमित साटम यांनी बीएमसीला या भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यासाठी आणि नागरी प्रशासनात पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करेल. पंतप्रधान मोदींच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विकासाभिमुख, भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी भाजपा कार्यकर्ते प्रत्येक मुंबईकरांपर्यंत दारावरती पोहोचून आशीर्वाद घेतील, असेही सांगितले.

About Editor

Check Also

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *