उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती, मोदी माझे शत्रु नाहीत पण ते मला मानत असतील मनसे-शिवसेना उबाठा दरम्यानची युती लवकरच जाहिर करणार

मराठीच्या मुद्यावरून राज्य सरकारच्या विरोधात शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे एकत्र आल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. तसेच आता आता एकत्र आलोय तर सोबत राहण्यासाठी अशी घोषणाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी घेत शुभेच्छा दिल्या. तर नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवा दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरी जात गणपतीचे दर्शन घेतले.

तर नुकतेच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या घरी जात तब्बल अडीच तास थांबले होते. त्यावेळी या दोन्ही ठाकरे बंधूनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या अनुषंगाने चर्चा केल्याच्या वावड्या राजकिय वर्तुळात उमटल्या होत्या. तसेच आता काही दिवसांवर दसरा मेळावा आला असून या दसरा मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार का, पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवसही उद्या येऊन ठेपला आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शुभेच्छा देणार का या सर्व प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

आज मराठवाड्यातील काही कार्यकर्त्यांनी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणार का असे विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, मी पंतप्रधान मोदी मला शत्रु मानत असतील, पण मी त्यांना शत्रु मानत नाही. पण ते ज्या पध्दतीने शिवसेना संपवायला निघाले आहेत. हे राजकारण आम्ही सहन करू शकत नाही. त्यांच्या मनात पाप असले तरी मी त्यांना शुभेच्छा देतो की, त्यांना सर्व गोष्टींचे आकलन व्हावे आणि उरलेल्या टर्ममध्ये चांगले काम करावे.

राज ठाकरे यांच्या घरी मागच्या आठवड्यात जवळपास अडीच तास वेळ घालवला त्या बद्दल विचारले असता उद्धव ठाकरे गंमतीत म्हणाले की, मी नाही गेलो किंवा गेलो तरी त्याची चर्चा होते. नेमकी अडचण माझ्या लक्षात येत नाही. मी गणेशोत्सवाला राज ठाकरे यांच्या घरी गेलो. माझ्या वाढदिवसाला ते मातोश्रीवर आले होते. आम्ही किती मोदक खाल्ले याचीही चर्चा माध्यमांत झाल्याचे गमंतीने म्हणाले.

राज ठाकरे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार का असा सवाल केला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, ते येतील पण माध्यमांनी जरा थांबावे. राज ठाकरे यांच्या घरी मागच्या आठवड्यात भेट देण्याचे कारण सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मावशी (राज ठाकरे यांची आई) मला घरी येत-जात रहा असं मागच्यावेळी म्हणाल्या होत्या. त्यामुळे आमचे आता असेच जाणे येणे सुरु राहिले असल्याचेही स्पष्ट केले.

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सवाल केला की, राज ठाकरे यांच्यासोबतची अधिकृत युती कधी जाहिर करणार, त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, लवकरात लवकर याची घोषणा करण्यात येईल असे सांगत जय हिंद, जय महाराष्ट्र असे म्हणत पत्रकार परिषद संपविली.

About Editor

Check Also

राज्यात रॉकेल वितरणाचा मोठा निर्णय; प्रत्येक कुटुंबाला ३ लिटर मिळणार मार्च महिन्यापासून रॉकेल वितरणाला सुरुवात पण लवकरच किंत जाहीर करणार, शासन आदेश जारी

एलपीजी गॅसच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात तात्पुरत्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *