देशातील निवडणुकांमध्ये झालेल्या घोटाळ्यांवर आयोगाकडून स्पष्टीकरण मागण्यासाठी आम्ही मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेत असेल तर त्यात काय चुकीचं आहे? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला. ते म्हणाले की, कोट्यवधी लोकांनी आम्हाला मतदान केलं आहे. त्यामुळे आम्ही फक्त निवडणूक आयोगाकडून उत्तर मागतोय. या देशातील लोकशाही संपली आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह, ज्ञानेश कुमार यांनी लोकशाही आणि संविधान संपवलं. निवडणूक हायजॅक करून त्यांनी लोकशाही संपवली.
VIDEO | Opposition’s protest against CEC in Delhi: LoP Lok Sabha Rahul Gandhi, says, “We are not only countering them, we are going to destroy them. I have no interest in what BJP says. I am standing here to save the democracy of India. A few hours ago, 300 Lok Sabha and Rajya Sabha MPs came here with me. They too are trying to save democracy in the country. Amit Shah, Narendra Modi, Mohan Bhagwat and Gyanesh Kumar… these people have destroyed the country’s democratic system. The entire country believes this. The youth of the country believe and understand this. Even the policemen who were stopping me here just now were saying the same thing… The country has been hijacked by Narendra Modi through vote theft. Amit Shah has hijacked it. Mohan Bhagwat has hijacked it, and Gyanesh Kumar has helped them. You will see… I am saying this after careful consideration. Action will be taken against all of them. You will see, not a single one of them will escape. Whether it is Narendra Modi, Amit Shah, Gyanesh Kumar or Mohan Bhagwat. What has been done to our country, is called treason. Nobody is going to escape.”
#RahulGandhi #CEC #OppositionProtest
(Full video available on PTI Videos – https://t.co/bIyFWTfmBd)
— Press Trust of India (@PTI_News) October 6, 2026
राहुल गांधी पुढे म्हणाले की, विरोधी पक्षांचे ३०० खासदार जर निवडणूक आयोगाला भेटून त्यांना काही प्रश्न विचारणार असतील तर त्यात काय चूक आहे? मी आधी ज्या ठिकाणी बसलो होतो त्या ठिकाणाहून मला हटवण्यात आलं. मला जर आंदोलन करायचं असेल तर मी कुठे आंदोलन करायचं हे पोलिसांनी मला सांगावं, असं राहुल गांधी म्हणाले.
इंडिया आघाडीचा मोर्चा
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याच्या मागणीसाठी दिल्लीत इंडिया आघाडीचा लोकशाही वाचवा मोर्चा सुरू आहे. मोर्चात इंडिया आघाडीचे १९ विरोधी पक्षांचे खासदार सहभागी झाले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्यासाठी संसदेत प्रस्ताव आणावा, मतदार यादीतून वगळण्यात आलेली नावे सार्वजनिक करावीत. नावे वगळण्यापूर्वी मतदाराला नोटीस आणि अपील करण्याची संधी मिळावी, आणि ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात, या इंडिया आघाडीच्या प्रमुख मागण्या आहेत.
महाराष्ट्रातून संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसचे खासदार मोर्चात सहभागी झाले आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी लोकशाहीविरोधात गद्दारी केली आहे, त्यामुळे त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत थेट रस्त्यावर उतरून आंदोलन केले. दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) ‘सेव्ह डेमॉक्रसी मार्च’ दरम्यान राहुल गांधी यांचा आक्रमक अवतार पाहायला मिळाला.
आंदोलनाला रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्सवर स्वतः चढत राहुल गांधी यांनी हातात तिरंगा फडकावला. या आंदोलनामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून संपूर्ण देश ढवळून निघाला आहे.
“मोदी, शाह आणि भागवतांनी लोकशाही संपवली”
आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मिळून देशातील लोकशाही संपवली आहे. देशाच्या निवडणुका मोदी आणि शाह यांनी हायजॅक केल्या असून ज्ञानेश कुमार यांनी त्यांना थेट मदत केली आहे,” असा आरोप राहुल गांधींनी केला.
ज्ञानेश कुमार घाबरले आहेत. जर लोकप्रतिनिधींना निवडणूक आयुक्त भेटणार नसतील तर देशात लोकशाही उरली कुठे? या सर्व प्रकारात सहभागी असलेल्या एकाही व्यक्तीला सोडले जाणार नाही, सर्वांवर देशद्रोहाची कारवाई होईल, असा थेट इशाराच राहुल गांधींनी दिला.
गनिमी काव्याने आकाशवाणी भवनात प्रवेश
संसद भवनापासून निघणारा हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जात असताना पोलिसांनी बॅरिकेडिंग करून इंडिया आघाडीच्या 300 हून अधिक खासदारांना रोखले. पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेऊन बसमध्ये बसवले. मात्र, बसमधून उतरून दोन्ही भावा-बहिणीने गनिमी काव्याने थेट जवळच असलेल्या आकाशवाणी भवनाच्या (Aakashvani Bhavan) परिसरात प्रवेश केला.
आकाशवाणी भवनातील एका झाडाखाली प्रियंका गांधी यांच्यासोबत बसून राहुल गांधींनी दोन तासांपेक्षा जास्त वेळ ठिय्या आंदोलन केले. निवडणूक आयोगाचे कार्यालय अवघ्या २७० मीटर अंतरावर असताना प्रतिनिधींना भेटू न देणे हा लोकशाहीचा अपमान असल्याची टीका त्यांनी केली.
दिल्ली ते मुंबई, पाच दिवसांत सातवे आंदोलन
एसआयआर (SIR) आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात ३० सप्टेंबरच्या बैठकीत इंडिया आघाडीने ६ ऑक्टोबर रोजी हा भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ३०० खासदार निवडणूक आयोगाकडे निघाले होते.
गेल्या पाच दिवसांत दिल्ली आणि मुंबईत निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात झालेले हे तब्बल सातवे मोठे आंदोलन आहे. राहुल गांधी यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आगामी काळात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.
Marathi e-Batmya