राज ठाकरे यांचा इशारा, ३ ते ४ महिन्याांमध्ये देशात काहीतरी मोठी गडबड होईल मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित छायाचित्रकार गजानन दुधाळकर यांच्या डान्स ऑफ डेमोक्रसी छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटनप्रसंगी बोलत होते

पुढील तीन -चार महिन्यात देशात काहीतरी मोठी गडबड होईल. येत्या काळात देशात गंभीर परिस्थिती निर्माण होऊन संपूर्ण देश रस्त्यावर येऊ शकतो असा खबळबळजनक दावा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज केला. तसेच पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, त्याचबरोबर पुढील काही काळ असाही येऊ शकतो की, देशाला काही काळ पंतप्रधानच नसतील असा दावाही यावेळी केला.

मुंबई प्रेस क्लबच्या इमारतीत छायाचित्रकार गजानन दुधाळकर यांच्या ‘डान्स ऑफ डेमोक्रसी’ या छायाचित्र प्रदर्शनाचं उदघाट्न झालं. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी वरील खळबळजनक दावा केला.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या व्होटचोरी प्रकरणावरून सुरु झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून आंदोलन कर्त्या राजकिय विरोधकांना दबाव तंत्रांचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या धामधुमीत विद्यार्थी आणि राजकीय पक्षाचे कार्यकर्त्ये नेतेही या आंदोलनात भरभरून प्रतिसाद देत आहेत. या पार्श्वभूमीवर रेजिम चेंजचा विषय आला. त्यास विरोधकांबरोबर भाजपाच्या विरोधकांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यातच राज ठाकरे यांनी हे विधान केले आहे.

शिवसेना उबाठाचे नेते तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा एपस्टीन फाईल्स प्रकरणातील प्रमुख आरोपी एपस्टीन यांच्यासोबत एकटेच चर्चा करताना दिसत आहेत, असा फोटो एक्सवर शेअर केला. त्यावरून राज ठाकरे यांना यासंदर्भात प्रश्न विचारला असता राज ठाकरे यांनी वरील विधान केले.त्यावर राज ठाकरे पुढे म्हणाले की, पुढील काळात खूप गोष्टी बाहेर येतील. सरकार चुकांवर चुका करत राहणार, आता हे थांबणार नसल्याचेही सांगत पुढील काही काळात संपूर्ण देश रस्त्यावर आला तरी मला आश्चर्य वाटणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट केले.

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, काही महिन्यापूर्वी NEET परिक्षेच्या पेपरलीक वरून आंदोलन सुरु झाले. आता निवडणूक आयोगाच्या विषयावर आंदोलन सुरु झाले. नीट आंदोलनावेळी जी विद्यार्थी मुले रस्त्यावर उतरली त्यातील प्रत्येकजण काही विद्यार्थी नव्हता. पण त्यांच्या मनात कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा राग होता. तो त्या माध्यमातून बाहेर आला. महाराष्ट्रातील आजची परिस्थिती पाहिली तर सरकारनेच ३०० हून अधिक तालुक्यात दुष्काळ जाहिर केला. पुढे आणखी परिस्थिती खराब होऊ शकते. अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊ शकते असा अंदाजही राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, पुढे आणखी भीषण परिस्थिती येणार असल्याचे सांगत काही काळ छोटा काळ असेल पण देशाला पंतप्रधानच राहणार नाहीत. तसेच देशात सुरु असलेल्या आंदोलनावर भाजपाने अराजकतेचा आरोप केला. पोलिसांच्या कपड्यात तुम्ही तुमच्या पक्षाचे कार्यकर्त्ये घुसवले. तुम्ही हंगामा केला, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काहीच केलं नाही असेही यावेळी स्पष्ट केले.

राज ठाकरे म्हणाले की, २०१८ पासून मी बॅलेटपेपरवर निवडणुका व्हाव्यात यासाठी प्रयत्न करतोय. त्यावेळी मी देशातील अनेक नेते आणि निवडणूक आयुक्तांनाही भेटलो होतो. त्यावेळी मी काय बोलतोय हे लोकांना कळालं नाही ते आता कळतंय. मतदानाच्या प्रक्रियेत पारदर्शकता असायला हवी. मी मतदान करतोय याचं समाधान मला असलं पाहिजे असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, जगातील बहुतांश पुढारलेल्या देशांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान होतं. फ्रान्समध्ये एका मतदाराने तक्रार केल्यानंतर तिथली ईव्हीएम मशीन्स बंद करून बॅलेट पेपरवर मतदान सुरू झालं मग भारतात ईव्हीएम मशिन्स कशाला हव्यात? असा सवाल केला.

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, पुढच्या साधारण ३ ते ४ महिन्याांमध्ये या देशात काहीतरी मोठी गडबड होईल एवढं निश्चित. पुढील काळात सरकारमधल्या अनेक गोष्टी समोर येतील. सरकार चुकांवर चुका करत राहील त्यातून काही महिन्यांमध्ये संपूर्ण देश रस्त्यावर आला तरी मला आश्चर्य वाटणार नाही असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, सरकारने महाराष्ट्रातील ३००-३२५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. ही परिस्थिती आणखी खराब होणार आहे आणि कोणतीही पूर्वतयारी नसल्याने ती परिस्थिती सरकारला झेपणार नसल्याचा इशाराही यावेळी दिला.

राज ठाकरे म्हणाले की, अमेरिकेतील कलाकार राष्ट्राध्यक्षांविषयी मत मांडतात म्हणून लगेच त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घातला जात नाही. आपल्याकडे त्याच भीतीने अनेक कलाकार बोलत नाहीत. शांततेत आंदोलन करणाऱ्या मुलांवर तुम्ही लाठीचार्ज केला, पोलिसांच्या गणवेशात तुम्ही तुमच्या पक्षाचे लोकं घुसवलेत, तुम्ही हंगामा केला, मुलांनी काहीच केलं नव्हतं. सबीर भाटीया यांनी अदानींवर एक डॉक्युमेंट्री बनवली आहे, ती काढून टाकायला सांगितलं आहे. कशाला काढायची? लोकांना पाहुदेत. प्रत्येक वेळी भाजपने स्पॉन्सर केलेलेच चित्रपट पाहायचे का आम्ही? असा सवालही यावेळी केला.

राज ठाकरे म्हणाले की, नागरी सुरक्षेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. हीच परिस्थिती जर भारतीय जनता पक्ष विरोधात असताना घडली असती तर ते काय बोलले असते? असा सवाल करत लॉरेन्स बिश्नोईसारख्या लोकांना जेलमधून बाहेर काढून फटकावून काढला पाहिजे. त्याशिवाय कायद्याची भीती कशी राहिल? असा सवालही यावेळी केला. मी अनेकदा हे सांगितलं आहे, आपल्याकडे लॉ आहे पण ऑर्डर नाही. माझा मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांवर १०० टक्के विश्वास आहे, त्यांना फ्री हँड दिला तर ते क्राईम रेट शून्यावर आणतील. तसेच गेल्या काही वर्षांमध्ये देशात साचलेल्या गोष्टी फार काळ दबून राहू शकत नाहीत. प्रत्येकाचा राग हा एक ना एक दिवस बाहेर येईल अशी भीतीही यावेळी सत्ताधाऱ्यांना दाखवून दिली.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांची मागणी, SIR प्रक्रियेत अनेक त्रुटी आणि अनियमितता, जाणीवपूर्वक नावे वगळणाऱ्यांवर कारवाई करा सत्ताधारी पक्षाचा फायदा होण्यासाठी विशिष्ट मतदारांची नावे वगळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे चोकलिंगम यांचे आश्वासन

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रिया अत्यंत किचकट असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *