सुनेत्रा पवारांचा अचूक नेम; बालेवाडीत नेमबाजीने जिंकली उपस्थितांची मने.. ! बालेवाडीत सुनेत्रा पवारांची रायफल शूटिंग; अचूक निशाण्याने सर्वच झाले थक्क; मिळवले १० पैकी १० गुण!

बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या पाहणीदरम्यान उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी नेमबाजीमध्ये आपले कौशल्य दाखवत १० पैकी १० गुण मिळवले.

क्रीडा संकुलातील नेमबाजी विभागाची पाहणी करत असताना तेथील लहान खेळाडूंनी सुनेत्रा पवार यांना शूटिंग रायफल हातात घेऊन नेमबाजी करण्याचा आग्रह केला. खेळाडूंच्या या प्रेमळ आग्रहाला मान देत त्यांनी रायफल हातात घेत लक्ष्य साधले.

सुनेत्रा पवारांच्या या अनपेक्षित नेमबाजी कौशल्यामुळे उपस्थित खेळाडू आणि मान्यवरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या अचूक निशाण्याचे उपस्थितांनी कौतुक केले. यावेळी लहान खेळाडूंच्या चेहऱ्यावरही विशेष आनंद पाहायला मिळाला.

About Editor

Check Also

आमदार रईस शेख यांची मागणी, मुंबई पालिकेचे रुग्णालय खाजगी ऑपरेटरला देण्याची निविदा रद्द करा आमदार रईस शेख यांचे पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे चालवल्या जाणारे एक रुग्णालय चालवण्यासाठी खाजगी ऑपरेटरला विक्री करण्याच्या प्रस्तावाला तीव्र आक्षेप घेत, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *