मुंबईत सफाई कर्मचाऱ्यांसाठी १६ हजार घरे देणार सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी
मुंबई शहरात सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी 16 हजार घरे मुंबईत उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत मुंडे बोलत होते.
राज्यातील सफाई कामगारांच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी त्वरित कार्यवाही सुरु आहे. तसेच लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सर्व सफाई कामगारांना लाभ देण्याबाबतचा विषयी मुख्यमंत्री महोदयांबरोबर लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी, सफाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड

वर्षा गायकवाड : काँग्रेस कार्यालयावर भाजपाचा मोर्चा म्हणजे ‘चोर तो चोर वरून शिरजोर’ विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर बोलण्याची भाजपाच्या टिनपाट अमित साटमची लायकी नाही – खा. वर्षा गायकवाड

लाखो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का केला त्याचे उत्तर द्या, स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांना साथ देणाऱ्या भाजपाने काँग्रेसला अक्कल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *