गायी-म्हशीच्या दूधाच्या दरात वाढः शनिवारपासून दरवाढ लागू दोन्ही दूधाच्या दरात दोन रूपयांची दरवाढ

मार्च महिना सुरु होऊन १०-१५ दिवस झाले नाही तोच राज्यातील तापमानात वाढ झाल्याचे जाणवत आहे, तसेच उन्हाच्या झळाही बसत आहेत. त्यामुळे अंगाला बसणाऱ्या उन्हाच्या झळापासून शरीरात गारवा निर्माण करण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ्यांच्या दही-ताक-आईसक्रिम आदी वस्तूंच्या मागणीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक आणि कल्याणकारी संघाने दूधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ही दरवाढ लगेच शनिवारपासून लागू करण्यात येणार आहे.

पुण्यातील कात्रज दूध संघात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीला गायीचे दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक संघटनेचे ४७ सदस्य हजर होते. या बैठकीत म्हशीच्या आणि गायीच्या दूधात प्रति लिटर २ रूपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दूधातील भेसळ आणि पनीर भेसळ रोखण्याबाबत चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांचे दूधाचे थकीत अनुदान लवकरात लवकर मिळावे यासाठी राज्याचे दुग्धविकास मंत्री आयुक्तांना लवकरात लवकर भेटण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दूध उत्पादक संघटनेचे अध्यक्ष गोपाळराव मस्के आणि मानद सचिव प्रकाश कुतवळ यांनी दिली.

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच दूध संकलनात घट झाली आहे. दुसरीकडे दुग्धजन्य पदार्थांसाठी दुधाची मागणी वाढत आहे. उन्हाळ्यामुळे चारा आणि पाणी टंचाई मुळे दूध उत्पादन खर्चात वाढही होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दूधाला वाढीव भाव देण्याची मागणी करावी लागल्याचे प्रकाश कुतवळ यांनी सांगितले.

गायीच्या दूधाचे सध्याचे आणि वाढीव दर
प्रति लिटर ५४-५६ ः ५६-५८

म्हशीच्या दूधाचे सध्याचे आणि वाढीव दर

प्रति लिटर ७०-७२ ः ७२-७४

About Editor

Check Also

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची स्पष्टोक्ती, महाराष्ट्रातील रबी हंगामासाठी केंद्राकडे विशेष उपाययोजनांची मागणी यांत्रिकीकरण व सूक्ष्म सिंचनासाठी प्रत्येकी ५०० कोटींचा निधी; १० लाख रबी ज्वारी बीज मिनी किट्सची मागणी

महाराष्ट्रातील विविध भागांत यंदा कमी व असमान पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि आगामी रबी हंगामातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *