Marathi E Batmya

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना पुन्हा संधी दिली जाणार का? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांचं काय होणार, त्यांना पक्षात पु्न्हा संधी दिली जाणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत मोठे वक्तव्य केलं आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांसाठी सर्व राजकीय पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. राजकीय नेते पक्षउभारणीसाठी प्रयत्न …

Read More »

नोव्हाक जोकोव्हिच ची दिग्गज मार्गारेट यांच्या विक्रमाशी बरोबरी २४ वं ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकलं!

यूएस ओपन २०२३चे स्पर्धेत नोव्हाक जोकोव्हिचने अजिंक्य पद पटकावले आहे. जोकोविचने न्यूयॉर्कमधील मार्गारेट कोर्टवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात डॅनिल मेदवेदेवचा पराभव करून २४ वे ग्रँडस्लॅम एकेरीचे विजेतेपद पटकावले. सर्बियन टेनिसपटूनोव्हाक जोकोव्हिचने अंतिम फेरीत डॅनिल मेदवेदेवचा पराभव करून चौथ्यांदा यूएस ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. नोव्हाक जोकोव्हिचचे हे विक्रमी २४ …

Read More »

आज होणार ‘अल्ट्रा झकास’ ओटीटीवर दोन रहस्यमय कथांचा उलगडा लिपस्टीक मर्डर , सिमर मराठी डब सिनेमांचा समावेश

गूढ, गुपितं, रहस्य आणि या अशा रहस्यांनी तुडुंब भरलेल्या कथा आणि त्यांचा होत जाणारा उलगडा नेहमीच आपल्याला रोमांचकारक अनुभव देत असतो आणि आपण त्यांची अनुभूती घेत असतो. अशाच रहस्यांनी भरलेले ‘सिमर’ आणि ‘लिपस्टिक मर्डर’ हे दोन मराठी डब चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटीच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यात रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचणार आहेत. …

Read More »

खेळाडूंनी कशी घ्यावी आपल्या हृदयाची काळजी? हृदय अचानक बंद पडणे म्हणजेच कार्डियाक अरेस्ट (एससीए) येणे होय

अनेकदा आपण तंदरुस्त खेळाडूंना देखील मैदानांध्ये, व्यायामशाळेत हृदय विकाराच्या झटक्याने जीव गमावताना पहिले आहे. इतके तंदरुस्त असून देखील खेळाडू खेळतानाच मूर्च्छा येणे किंवा अचानक हृदय विकाराचे झटके का येत असतील? याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे सडन कार्डियाक अरेस्ट म्हणजेच SCA समावेश आहे. हृदय अचानक बंद पडणे म्हणजेच …

Read More »

एस टी च्या कर्मचारी संघटना विरहित व मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रयत्नाने पदोन्नतीची चाके फिरणार मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने याबाबत प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली

महाराष्ट्र राज्याची लाल परी म्हणजे सर्वसामान्य माणसांची प्रवास वाहिनी आहे. एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संघटना विरहित राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत त्यांना निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने याबाबत प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली.  एसटी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची चाके गतीने फिरणार असल्याचे संकेत मिळाले …

Read More »

राज्य युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या नाशिक विभाग अध्यक्षपदी शरद तांबेंची नियुक्ती नाशिक विभाग अध्यक्ष पदाची धुरा

महाराष्ट्र राज्य युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील संपादक शरद  तांबे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. शरद तांबे यांचे महाराष्ट्र राज्य युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश रामराव कचकलवार यांनी नुकतेच दिले आहे. पत्रकारांच्या न्याय व …

Read More »

Mera Bill Mera Adhikaar सरकारी योजनेत १ कोटी जिंकण्याची संधी, फक्त २०० रुपयांची खरेदी करा प्रत्येक खरेदीसाठी ग्राहकांना बिल/जीएसटी इनव्हॉइस मागण्याची सवय लावणे हा यामागचा उद्देश आहे.

तुम्हाला फक्त २०० रुपयांच्या खरेदीवर १ कोटी रुपयांपर्यंतचे रोख बक्षीस जिंकायचे आहे का? सरकार १ सप्टेंबरपासून Mera Bill Mera Adhikaar ‘मेरा बिल मेरा अधिकार’ नावाची जीएसटी योजना सुरू करत आहे. या योजनेअंतर्गत लोकांना २०० रुपये किंवा त्याहून अधिक किंमतीच्या कोणत्याही वस्तू किंवा सेवांचे जीएसटी बील अपलोड करावे लागेल. बील अपलोड …

Read More »

भारतीय अर्थव्यवस्था वेगात, जून तिमाहीत जीडीपी ७.८ टक्क्यांवर जगातील कोणत्याही मोठ्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत हा सर्वात वेगवान विकास दर आहे.

चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची दमदार सुरुवात केली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेने पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ नोंदवली आहे. जगातील कोणत्याही मोठ्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत हा सर्वात वेगवान विकास दर आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) ने गुरुवारी संध्याकाळी पहिल्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी जाहीर केली. यापूर्वी कोअर सेक्टरची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती, …

Read More »

संसदेचे 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान विशेष अधिवेशन अचानक बोलावलेल्या या 5 दिवसीय विशेष अधिवेशनात नेमकी कुठल्या विषयावर चर्चा होणार यावरून राजकीय वर्तुळात अंदाज बांधले जात आहेत.

विशेष अधिवेशन

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : केंद्र सरकारने आगामी 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. अचानक बोलावलेल्या या 5 दिवसीय विशेष अधिवेशनात नेमकी कुठल्या विषयावर चर्चा होणार यावरून राजकीय वर्तुळात अंदाज बांधले जात आहेत. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करून अमृतकालात 18 ते 22 …

Read More »

जम्मू-काश्मिरात ८ फरार दहशतवाद्यांना अटक तब्बल ३० वर्षांपासून फरार होते दहशतवादी

8 fugitive terrorists arrested in Jammu and Kashmir

जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी आज, गुरुवारी ८ फरार जिहादी दहशतवाद्यांना अटक केली. हे जिहादी दहशतवादी तीन दशकांपासून लपून बसले होते आणि अटक टाळत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये आदिल फारुख फरीदी (सरकारी कर्मचारी), मोहम्मद इक्बाल, मुजाहिद हुसेन, तारिक हुसैन, इश्तियाक अहमद देव, एजाज अहमद, जमील अहमद आणि …

Read More »