Editor

तो आदेश रद्द केल्याने आता गावाकडील घराच्या मालमत्तेवर कर्ज मिळणार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. ग्रामविकास विभागाच्या ६ डिसेंबर २०१७ रोजीच्या एका आदेशान्वये ग्रामस्थांच्या मालकीहक्क दर्शविणाऱ्या मालमत्ता कर आकारणी पत्रक नमुना ८ वर कर्जाच्या बोजाची नोंद करण्यास मनाई करण्यात आली होती. पण आता हा आदेश रद्द करण्यात येत असून त्यामुळे ग्रामस्थांना …

Read More »

राज्यात चाचण्या वाढविल्या पण मुंबईत मात्र कमीच ४२ टक्के वाढविताना मुंबईत केवळ १४ टक्के चाचण्या-फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भीषण होत असताना, मुंबईतील चाचण्या वाढवा असा सातत्याने आग्रह करीत असताना सुद्धा मुंबईत जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ १४ टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. हीच संख्या राज्याच्या बाबतीत ४२ टक्के आहे. त्यामुळे मुंबईत तातडीने चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा …

Read More »

गज्जा दत्ताराम पवार ( GDP ) पडला … सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवावर आधारीत काल्पनिक कथा

आज  गावात  देशभक्तीची  प्रमाणपत्र वाटण्यात येत होती, देश अगदी आर्थिकदृष्ट्या जरी घरंगळत जात असला तरी देशभक्तीच्या उधाणात व्यवस्थित तरंगत असताना, पम्या ढोपरं फोडीत कार्यक्रम चालू असलेल्या सभागृहाच्या दारात आला, मोठ्याने ओरडला आपला जी डी पी पडला. कार्यक्रमाला अर्थशात्र विभागाचे घोणसे सर उपस्थित होते ते अचानक उभे राहिले आणि सगळ्यांचं लक्ष्य वेधून घेतलं ” बघा आपला  देश …

Read More »

कोरोना: एकूण बाधित ८ लाखापार तर अॅक्टीव्ह रूग्ण दोन लाखाच्या उंबरठ्यावर १५ हजार ७६५ नवे बाधित, १० हजार ९७८ बरे झाले तर ३२० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज १५ हजार ७६५ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने एकूण बाधित रूग्णांची संख्या ८ लाख ८ हजारावर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाखाच्या उंबरठ्यावर अर्थात १ लाख १८ हजार ५२३ वर पोहोचली आहे. तर १० हजार ९७८ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ५ लाख ८४ …

Read More »

खुषखबर : उद्यापासून महाराष्ट्रातील रेल्वे बुकिंग आणि प्रवास सुरु राज्य सरकारच्या missionbeginagain च्या मार्गदर्शक तत्वानंतर रेल्वेची माहिती

मुंबई: प्रतिनिधी नुकतेच राज्य सरकारने राज्यातल्या राज्यात प्रवास करण्यासाठी असलेली ई-पासची अट काढून टाकल्यानंतर महाराष्ट्रात प्रवास करण्यासाठी रेल्वेनेही परवानगी देत उद्यापासून बुकिंग करता येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे प्रवासास परवानगी दिली नव्हती. त्यामुळे अनेकजणांना कामानिमित्त बाहेरगावी आणि इतर ठिकाणी जाता येत नव्हते. मात्र रेल्वेच्या निर्णयामुळे आता राज्यातल्या …

Read More »

नवउद्योजकांसाठी डिक्कीने उभारले सुविधा केंद्र चेंबूरमध्ये उभारले कार्यालय

मुंबई : प्रतिनिधी दलित इंडियन चेंबर ॲाफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री अर्थात डिक्कीच्या मुंबई विभागातर्फे उद्योग सुविधा केंद्र उभारले आहे. उद्योजक, व्यावसायिक विशेषत: नवउद्योजकांसाठी हे सुविधा केंद्र लाभदायक ठरणार आहे. ऐस टेक्नॉलॉजिचे विशेष सहकार्य यासाठी मिळणार आहे. सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे , डिक्की महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोष कांबळे, मुंबई विभाग …

Read More »

या बँका देणार शासकिय अधिकाऱ्यांना वेतन खात्याबरोबर अपघात विम्याचे कवच राज्य सरकारकडे बँकांनी सादर केले प्रस्ताव

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राष्ट्रीयकृत बँकामधील आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच काही बँकामधील गंगाजळी कमी झाल्याचे चर्चा ऐकायला मिळत आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील चार बँकांनी आपल्या बँकातील आर्थिक व्यवहार वाढविण्याच्यादृष्टीने शासकिय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बँकांमध्ये पगाराची खाती उघडल्यास अपघात विम्याचा मोफऱत लाभ देण्याची घोषणा केली. तसेच त्यासंदर्भातचा एक …

Read More »

यंदाचा शिक्षक दिन साजरा होणार सोशल माध्यमांवर “Thanks A Teacher “ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले, रविद्रनाथ टागोर यांच्यासह माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल आणि माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या शिक्षक दिनानिमित्त यंदा “Thanks A Teacher” हे अभियान सोशल मिडियाच्या माध्यमातून साजरा करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आला आहे. …

Read More »

माजी राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांचे निधन वयाच्या ८४ व्या वर्षी रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसचे संकट मोचक तथा देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया या महिन्याच्या सुरुवातीला करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळण्यास सुरुवात झाली. त्यातच ते कोमात गेले. कोमातून बाहेर आणण्यासाठी त्यांच्यावर अनेक उपचार करण्यात आले. परंतु ते कोमातून …

Read More »

कोरोना: बाधित आणि बरे होणाऱ्यांची संख्या समसमान ११ हजार ८५२ नवे बाधित, ११ हजार १५८ बरे झाले तर १८४ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज पहिल्यांदाच ११ हजार रूग्ण बाधित झालेले आढळून आले तर ११ हजार रूग्ण बरे होवून घरी गेले. मात्र घरी जाणाऱ्यांपेक्षा बाधित रूग्णांची संख्या ८५२ इतकी जास्त आहे. घरी जाणाऱ्यांची संख्या ५ लाख ७३ हजार ५५९ वर पोहोचली. तर एकूण बाधित रूग्णांची संख्या ७ लाख ९२ हजार …

Read More »