Editor

भाजपाच्या केंद्रीय कार्यकारणीत मुंडे, तावडे राष्ट्रीय सचिव, तर हिना गावित राष्ट्रीय प्रवक्ते महाराष्ट्रातून ७ जणांची वर्णी

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणूकीत उमेदवारी मिळेल म्हणून आशेवर बसलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांचे तिकिट पुन्हा कापण्यात आले. परंतु यापैकी पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना थेट राज्याच्या राजकारणातून दिल्लीच्या राजकारणात स्थान देत पक्षाच्या केंद्रीय सचिव पदी अर्थात राष्ट्रीय मंत्री पदी …

Read More »

कोरोना : बरे झालेल्या रुग्ण संख्येने ओलांडला १० लाखांचा तर मृतकांच्या संख्येने ३५ हजारांचा टप्पा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यामध्ये कोरोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने आज १० लाखांचा टप्पा ओलांडला. दिवसभरात २३ हजार ६४४ रुग्ण रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. त्यामुळे राज्यभरात आतापर्यंत १० लाख १६ हजार ४५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २० हजार ४१९ नवे बाधित आढळल्याने एकूण रूग्ण संख्या १३ लाख २१ हजार …

Read More »

राज्यातील पर्यटनवृध्दीसाठी केंद्राकडून प्रतिसाद मिळत नाही- आदित्य ठाकरे पर्यटन व्यावसायिकांना पॅकेज द्या व प्रोत्साहनासाठी विशेष अभियान राबवावे - ललित गांधी

कोल्हापूर: प्रतिनिधी कोरोना महामारीच्या प्रदीर्घ काळ अस्तित्वामुळे महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राशी संबंधित ट्रॅव्हल एजंटस्, हॉटेल्स, रिसॉर्टस्, ट्रॅव्हल कंपन्या यांच्यासाठी विशेष पॅकेज द्यावे अशाी मागणी फिक्कीच्या राष्ट्रीय कार्यकारीनीचे सदस्य व महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. फिक्की महाराष्ट्र समितीद्वारे २७ सप्टेंबर च्या ‘जागतिक पर्यटन …

Read More »

बेस्टची राज्याच्या मंत्र्यांवर अशीही मेहेरबानी लॉकडाऊन काळात वीज बीलेच पाठविले नसल्याची माहिती उघड

मुंबई : प्रतिनिधी शहरात वीज पुरवठा करणारी बेस्ट वीज कंपनीने सामान्य नागरिकांना लॉकडाउनमध्ये जादा रक्कमेची विद्युत देयके पाठविल्याची तक्रार सर्वश्रुत आहे. पण त्याच बेस्ट प्रशासनाने राज्यातील मंत्र्यांना लॉकडाउन कालावधीतील ४ ते ५ महिन्याची विद्युत देयकेच पाठविली नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. सार्वजनिक बांधकाम …

Read More »

गृहनिर्माण विभागाकडून विकासकांना दिली ही सवलत प्रिमियम भरण्यात ३१ मार्च २०२० पर्यत सवलत

मुंबई : प्रतिनिधी राज्यात एसआरए योजना लागू असलेल्या शहरात झोपडपट्ट्यांचा पुर्नविकासापोटी विकासकांना भराव्या लागणाऱ्या प्रिमियम भरण्याच्या पध्दतीत बदल करत कोरोना आणि नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार आता विकासकांना दोन टप्प्यात प्रति १० टक्के आणि शेवटी ८० टक्के प्रिमियम भरण्याची मुभा देण्यात आली असून ही सवलत ३१ मार्च २०२० …

Read More »

अनुभव, क्षितीज आणि ड्रग्ज प्रकरणाशी संबध नाही खोट्या बातम्या बंद न केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचा प्रसारमाध्यमांना करण जोहरचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून बॉलीवूडमधील कथित ड्रग्ज प्रकरणाशी आणि अनुभव चोप्रा, क्षितीज रवि प्रसाद याचा माझ्याशी व धर्मा प्रोडक्शनशी जोडण्यात येत आहे. त्यासंबधीचे खोटे वृत काही वृत्तवाहिन्या, प्रसारमाध्यमाकडून सातत्याने प्रसारीत करून माझी, कुटुंबियांची आणि माझ्या जवळच्या व्यक्तीची बदनामी करण्यात येत आहे. त्यामुळे खोट्या बातम्या प्रसारीत करण्याचे थांवविले नाही …

Read More »

किसान सभेतर्फे २१ जिल्ह्यात शेतकरी कायद्याविरोधात आंदोलन रास्ता रोको, कायद्याची होळी ५० हजार शेतकरी झाले सहभागी

मुंबई: प्रतिनिधी अखिल भारतीय किसान सभेतर्फे आज महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांत ५० हजार शेतकऱ्यांतर्फे केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्यांच्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन, कायद्यांची होळी करण्यात आली. आज २५ सप्टेंबर रोजी देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या २१ जिल्ह्यांत ५० हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलने वा उग्र निदर्शने …

Read More »

आशा स्वंयसेविका, गटप्रवर्तकांनी प्रस्तावित कामबंद आंदोलन स्थगित करा मुख्यमंत्री ठाकरेंचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आशा स्वंयसेविका आणि गटप्रवर्तक हे आरोग्य विभागाचा कणा असून कोरोना विरोधातील लढ्यात त्यांची भूमिका मोलाची असल्याने दिनांक २८ सप्टेंबर २०२० पासून प्रस्तावित असलेले कामबंद आंदोलन त्यांनी स्थगित करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केले आहे. शासननिर्णय निर्गमित लवकरच मोबदला मिळणार मुख्यमंत्र्यांनी आपल्या …

Read More »

कोरोना: २५ दिवसात राज्यात एकूण बाधित ४ लाख ९२ तर घरी जाणारे ४ लाखाने वाढले १७ हजार ७९४ नवे बाधित, १९ हजार ५९२ बरे झाले तर ४१६ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील २५ दिवसात कोरोनाबाधित रूग्णांच्या एकूण संख्येत तब्बल ४ लाख ९२ हजार ४५१ संख्येने वाढली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ७२ हजार ७७५ इतकी झाली आहे. त्यामुळे एकूण रूग्ण संख्या १३ लाखापार गेली. तर बरे होवून घरी जाणाऱ्यांच्या संख्येत ४ लाख ८ हजार २६९ इतकी वाढ झाली …

Read More »

अस्तित्वाच्या भीतीने काँग्रेसचा शेतकरी, कामगार विधेयकांबाबत अपप्रचार भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी शेतकरी आणि कामगार वर्गाच्या कल्याणात मैलाचा टप्पा ठरणारी विधेयके संसदेत मंजूर झाली आहेत.  राजकीय अस्तित्वाच्या भीतीने सैरभैर झालेल्या काँग्रेसकडून मोदी सरकारच्या प्रत्येक निर्णयाबाबत जनतेच्या मनात संभ्रम पसरविण्याचे काम सुरु असल्याची टीका करत शेतकरी , कामगार या अपप्रचारावर विश्वास ठेवणार नाहीत, असा विश्वास भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला. …

Read More »