भारताने रविवारी संयुक्त राष्ट्र (UN) आमसभेच्या समान-क्षेत्रफळ जागतिक नकाशांच्या वापरास प्रोत्साहन देणाऱ्या ठरावाला पाठिंबा दिला, परंतु हे स्पष्ट केले की त्यांचा पाठिंबा कोणत्याही विशिष्ट नकाशा प्रक्षेपणाला किंवा राष्ट्रीय सीमांच्या चित्रणाला मान्यता देत नाही. ४ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र आमसभेने “नकाशा दुरुस्त करा: जागतिक नकाशाशास्त्रीय प्रतिनिधित्वाचे पुनर्संतुलन करणे आणि जगाच्या प्रदेशांचे, …
Read More »दिल्लीत पाच मजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी इमारतीत अनेक विद्यार्थी पेईंग गेस्ट म्हणून अथवा वसतिगृह म्हणून रहात होते
दक्षिण-पश्चिम दिल्लीतील सत्य निकेतन येथे रविवारी दुपारी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पेइंग गेस्ट निवासस्थानाची पाच मजली इमारत कोसळली, यात किमान एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि दोघे गंभीर जखमी झाले. बहु-संस्था बचावकार्य सुरू असताना, बहुतेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना राजधानीतील दिल्ली विद्यापीठाच्या दक्षिण कॅम्पसजवळ घडली. आतापर्यंत आठ …
Read More »राज ठाकरे यांचा सवाल, जीडीपी वाढला हे कसं शक्य ? जीडीपी वाढी प्रकरणी पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यावर केला सवाल
देशातील १३ हजार उद्योगपतींनी देश सोडलाय. आणि ज्या ५०३ परदेशी कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करून त्यांचे कामकाज सुरु केलं होतं. ते कामकाज आता बंद केलंय. मग किती जणांचे रोजगार गेले असतील? हा डेटा कार्पोरेट मिनिस्ट्रीचा असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी परदेशातून व्हिडीओ करून सांगतात परदेशात जाऊन नका, सोनं खरेदी करू नका आणि …
Read More »संजय गांधी राष्ट्रीय उद्याना लगतच्या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी हालचाली गतिमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न, पहिल्या टप्प्यात ४ हजार नागरिकांचे पुनर्वसन होणार
गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला गती देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर याबाबत आज उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत उद्यानाच्या हद्दीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा सविस्तर आढावा घेऊन, येथील नागरिकांच्या …
Read More »ग्रामपंचायत आरक्षणाच्या नियमांवर वंचित बहुजन आघाडीचा आक्षेप नियम ७ आणि शून्य लोकसंख्येवरील आरक्षण रद्द करण्याची मागणी
ग्रामपंचायत निवडणूक नियमावलीतील काही तरतुदी आणि आरक्षण निश्चित करण्यासाठी प्रशासनाकडून राबवली जाणारी पद्धत ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वावर परिणाम करणारी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. ग्रामपंचायत आरक्षणातील ‘अपूर्णांकातील जागा मोजण्याची’ पद्धत आणि संबंधित प्रवर्गाची लोकसंख्या शून्य असलेल्या प्रभागांमध्ये आरक्षण लागू करण्यास पक्षाने …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, ‘नशामुक्त महाराष्ट्र’ला बळकटी देण्याचे काम दहीहंडीच्या उत्सवातून व्हावे वरळी, दादर, घाटकोपर येथे आयोजित विविध दहीहंडी उत्सवाना भेट
युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी योगदान द्यावे, यासाठी सामाजिक उपक्रमांना व्यापक लोकसहभागाची जोड देणे आवश्यक आहे. उत्साहाने भरलेल्या दहीहंडीच्या उत्सवामधून ‘नशामुक्त महाराष्ट्र’ या संकल्पनेला बळकटी देण्याचे काम व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरळी, दादर, घाटकोपर येथे आयोजित विविध दहीहंडी उत्सवांना …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, भाजपाने सेंच्युरी मिलची १३ हजार कोटींची जमीन कवडीमोल भावाने बिल्डरच्या घशात घातली सेंच्युरी मिलचा लीज प्रस्ताव ताबडतोब थांबवा आणि गिरणी कामगारांचे ऑनसाइट पुनर्वसन सुनिश्चित करा
मोदी सरकार सरकारने सत्तेत आल्यापासून देशाची सार्वजनिक संपत्ती खास उद्योगपतींच्या घशात घालण्याचा सपाटा लावला असून मुंबईतील धारावी, रेल्वे, मिठागरांच्या जमिनींपासून बीएमसीच्या मोक्याच्या भूखंड खास लोकांनाच विकले आहेत. २२ BEST डेपो, वरळी लॅबोरेटरी-प्लांट, मदर डेअरी, देवनार व मुलुंड डंपिंग ग्राउंड यांसारख्या सार्वजनिक जमिनी बहाल केल्यानंतर आता लोअर परळमधील सेंच्युरी मिलची जमीनही …
Read More »पंतप्रधान मोदी यांनी दिल्ली मेट्रोने श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स पर्यंत केला प्रवास एसआरसीसीच्या १०० वर्षाच्या सोहळ्याला लावली उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्सला (SRCC) जाण्यासाठी एक अनोखा मार्ग निवडला: दिल्ली मेट्रो. एसआरसीसीच्या (SRCC) १०० वर्षांच्या सोहळ्यातील आपल्या भाषणापूर्वी, मोदींनी मेट्रो कार्ड सोबत बाळगून मेट्रोने प्रवास केला आणि ट्रेनमधील लोकांशी संवाद साधला. प्रवासादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशीही संवाद साधला, ज्यामुळे त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्यांसाठी हा रोजचा प्रवास …
Read More »व्लादिमीर पुतीन यांचे युक्रेनवर तीन दिवस हल्ले न करण्याचे आदेश, अमेरिकेचे शिष्टमंडळ रशियात तीन दिवसासाठी रशिया आणि युक्रेन दरम्यानचे य़ुद्ध स्थगित
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपवण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशाने होणाऱ्या चर्चेसाठी अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांच्या आगमनाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शनिवारपासून कीववरील हल्ले तीन दिवसांसाठी थांबवण्याचे आदेश दिले आहेत. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले की, व्लादिमीर पुतिन शनिवारी दोन अमेरिकन …
Read More »दहिहंडीच्या उत्सवात पुण्यात एक महिलेचा मृत्यू मुंबई ठाण्यात ४२ गोविंदा जखमी जखमीना रूग्णालयात दाखल केले तर काहींना उपचार करून सोडून देण्यात आले
पुण्यात दहीहंडीच्या उत्सवादरम्यान एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि मुंबई व ठाण्यात किमान ४२ गोविंद जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. पुण्यात लाऊडस्पीकरला आधार देणारी तात्पुरती लोखंडी रचना अंगावर कोसळल्याने सलमा सलाउद्दीन पठाण यांचा मृत्यू झाला, तर मुंबई आणि ठाण्यातील कार्यक्रमांमध्ये मानवी मनोरे तयार करताना गोविंद जखमी झाले. …
Read More »
Marathi e-Batmya