Editor

कुडनकुलम न्युक्लिअर प्लॅन्टची कागदपत्रे लिक रिलायन्सकडून कोणती माहिती लिक याची माहिती देण्यास नकार

रॅन्समवेअर गट वर्ल्ड लीक्सने डार्क वेबवर भारतातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाशी संबंधित फाईल्सचा एक मोठा साठा पोस्ट केला आहे, ज्यामध्ये प्रकल्पाच्या काही भागांचे कथित आराखडे आणि पुरवठादारांचा तपशील समाविष्ट आहे — ही माहिती अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपकडून आल्याचे त्यांनी म्हटले आहे. तामिळनाडूमध्ये असलेला कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प हा भारतातील सात अणुऊर्जा …

Read More »

सोनम वांगचुक यांच्यासाठी एक दिवसीय उपोषणाचे सीजेपीचे आवाहन सद्भावनेसाठी एक दिवस उपोषण करण्याचे आवाहन

नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणाऱ्यांसोबत गेल्या १८ दिवसांपासून अनिश्चित काळासाठी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्ते आणि नवोन्मेषक सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) उद्या एक दिवसीय सामूहिक उपोषणाची हाक दिली. “उद्या, १६ जुलै रोजी, सोनम वांगचुक आणि या देशातील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आमच्यासोबत एक दिवसीय सामूहिक …

Read More »

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते ‘भारत टेक्स’मधील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन उद्योगस्नेही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन

नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपममध्ये आयोजित करण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन ‘भारत टेक्स २०२६’ मध्ये वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यंदा महाराष्ट्राचा भागीदार राज्य (पार्टनर स्टेट) म्हणून या प्रतिष्ठित प्रदर्शनात सहभाग असून, राज्याच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील क्षमता, परंपरा आणि आधुनिकतेचा संगमाचे दर्शन या दालनातून …

Read More »

आदिती तटकरे यांची माहिती, मुक्तबंदी, परिविक्षाधीन बंदीच्या सहायक अनुदानात दुप्पट वाढ निर्दोष बंद्यांनाही पुनर्वसनासाठी आता मिळणार ५० हजार रूपयांचे अनुदान

कारावासाची शिक्षा पूर्ण केलेले मुक्तबंदी, परिविक्षाधीन बंदी यांच्या पुनर्वसनासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत सहायक अनुदान योजना राबविण्यात येते. या बंदीवानांच्या अनुदानात दुप्पट वाढ करून ती रू.२५ हजार अनुदानावरून आता रू.५० हजार इतकी करण्यात आली आहे. तसेच या योजनेत आता, निर्दोष मुक्त झालेल्या  परंतु किमान एक वर्ष शिक्षा भोगलेल्या बंदींचाही समावेश करण्यात …

Read More »

सुप्रिया सुळे यांची डिलिमिटेशनवर भूमिका स्पष्ट, नवीन बिल आलेच नाही, मग भूमिका कशी घेणार अफवांवर सुप्रिया सुळे यांचा संताप

मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने पाठिंबा दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी या वृत्तांचे जोरदार खंडण केले. “बिल आलेच नाही, मग आमची भूमिका कशावरून सांगायची? जे अस्तित्वातच नाही, त्यावर चर्चा करून अफवा पसरवण्याला काही अर्थ नाही,” अशा शब्दांत सुरू असलेल्या अफवांचा समाचार …

Read More »

जयंत पाटील यांची माहिती, काल मध्यरात्री वर्षा बंगल्यावर काय घडले मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला गेल्यावर काय घडलं याची सांद्यत माहिती जयंत पाटील यांनी दिली

काल मंगळवारी मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंत पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल अचानक वर्षा बंगल्यावर पोहोचले. यावरून महाविकास आघाडीत फूट पडल्याचे वृत्त पसरताच जयंत पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील ईश्वरपुर …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शेतकऱ्यांची ४८ हजार कोटींची वीजबिल थकबाकी माफ शेतकऱ्यांच्या कृतज्ञता सोहळयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

राज्यातील शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तीपर्यंत वीजबिल आकारले जात नाही. मात्र, त्यांची वीज वापराची ४८ हजार कोटींची जुनी थकबाकीही आता माफ केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत सत्कार सोहळ्यात बोलताना जाहीर केले. तुतारींच्या गजरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे उत्स्फूर्त स्वागत केले. शेतकऱ्यांची पाटी कोरी व्हावी आणि या …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही देशाचा कारभार ‘बंच ऑफ थॉट’नुसार चालतो; दिल्लीतील सरकार ‘हम दो, हमारे दो’साठी; शेतकरी प्रश्न, महागाई, बेरोजगारीवर पंतप्रधान मोदी गप्प

मागील १२ वर्षापासून ‘चौकीदार ही चोर है’ अशी पार्श्वभूमी आपल्या देशाला लाभली असून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून शेतकरी संकटात सापडलेला आहे. शेतमालाला भाव नाही, शेती करणे महाग झाले आहे, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र शेतकरी, महिला अत्याचार, बेरोजगारी, महागाई यावर गप्प आहेत. अमेरिकेसमोर नरेंद्र मोदी सरेंडर झाल्याने आता आपला …

Read More »

आदिती तटकरे यांचे निर्देश, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी बालगृहांची सुविधा उपलब्ध करा मुलींचे शिक्षण, बालविवाह रोखण्यासाठी सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश

राज्यातील ऊसतोड कामगार स्थलांतरित होत असताना त्यांच्या मुलांना संबंधित जिल्ह्यांतील बालगृहांमध्ये तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. राज्यातील बालगृहांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महिला व बालविकास मंत्री आदिती …

Read More »

दत्तात्रय भरणे यांची माहिती, शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे मिळण्यासाठी सर्वसमावेशक धोरण बियाणा व्यवस्थेतील प्रत्येक टप्पा अधिक सक्षम करणे हे शासनाचे उद्दिष्ट

राज्यातील शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध व्हावे, निकृष्ट अथवा बनावट बियाण्यांमुळे त्यांचे नुकसान होऊ नये आणि बियाणे उत्पादन, साठवणूक, तपासणी व विक्री प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण व्हावे, यासाठी सर्व संबंधितांच्या सूचनांचा विचार करून राज्य शासन सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. मंत्रालयात बियाणे तपासणीच्या उत्तरदायित्वाच्या कार्यपद्धतीत (SOP) बदल करून …

Read More »