डॉ पायल तडवी आत्महत्या प्रकरण : नायर रुग्णालयाच्या डॉ. चिंग लिंग चुंग चियांगही आरोपी करा विशेष न्यायालयाकडून सरकारी पक्षाची मागणी मान्य

डॉ पायल तडवी आत्महत्याप्रकरणी नायर रुग्णालयाच्या संबंधित विभागाच्या तत्कालीन प्रमुख आणि प्राध्यापक डॉ चिंग लिंग चुंग चियांगही आता आरोपी असणार आहेत. त्यांना आरोपी करण्याची सरकारी पक्षाची मागणी विशेष न्यायालयात मान्य केली आहे.

डॉ पायल तडवी यांनी वारंवार तक्रारी करूनही डॉक्टर चिंग यांनी तिन्ही आरोपी डॉक्टरांविरुद्ध कोणतीही कारवाई न केल्यामुळे, आरोपींनी डॉ पायल यांना त्रास देणे सुरूच ठेवल्याचा दावा सरकारी पक्षाने उपरोक्त मागणी करताना केला होता. विशेष न्यायालयाने सरकारी पक्षाची ही मागणी मान्य केली. दरम्यान, डॉ अंकिता खंडेलवाल, डॉ भक्ती मेहेरे आणि डॉ हेमा अहुजा या तिघींवर डॉ पायल यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या तिघींना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर, या तिघीनी त्यांना प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी विशेष न्यायालयात केली होती. ती मान्य करण्यास विशेष न्यायालयाने नकार दिला होता.

डॉ पायल तडवी हिने २२ मे २०१९ रोजी नायर रुग्णालयाच्या वसतिगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्यावर सतत जातीवाचक शेरेबाजी करुन तिचा मानसिक छळ केल्यामुळे तिने आहत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला. त्यानंतर, पोलिसांनी या प्रकरणी आरोपींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रोसिटी) गुन्हा दाखल केला होता.

डॉ पायल तडवी तणावाखाली आणि कामाचा ताण सहन करू न शकल्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचे भरपूर पुरावे आहेत, असा दावा आरोपींनी दोषमुक्तीची मागणी करताना केला होता. पायल अनुसूचित जमातीतील असल्याची आपल्याला कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती. त्यामुळे, जातीवरून तिची छळवणूक केल्याचा आणि तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप तथ्यहीन असल्याचा दावाही तिघींनी केला होता.

About Editor

Check Also

मुंबई उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल, मुंढवा जमिन प्रकरणातून पार्थ पवार यांचे नाव का वगळले ? मुंडवा जमिन प्रकरणात ९९ टक्के हिस्सा पार्थ पवार यांचा आणि १ टक्का हिस्सा निलंबित तहसीलदाराचा

मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी, जमीन खरेदी करणाऱ्या ‘अमाडिया एंटरप्रायझेस एलएलपी’ (Amadea Enterprises LLP) या कंपनीत ९९ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *