ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री तथा भाजपा खासदार कंगना राणौत यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर वादावर शुक्रवारी दोघांनीही मध्यस्थीद्वारे तोडगा काढला आणि तब्बल पाच वर्षांनी या वादावर पडदा पडला. आपल्यामुळे ज्येष्ठ लेखकाला झालेल्या गैरसोयीबद्दल अभिनेत्री कंगना राणौतने जावेत अख्तर यांची माफीही मागितली. शुक्रवारी वांद्रे येथील विशेष न्यायालयात हजर …
Read More »सर्वोच्च न्यायालयाने जीएसटी- कस्टम ड्युटी चुकवेप्रकरणी अटकेला योग्य ठरविले न्यायालयाचा निर्वाळा झालेली अटक कायदेशीरच
गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी कायदा आणि सीमाशुल्क कायद्यांतर्गत अटक आणि खटल्याच्या तरतुदींची घटनात्मक वैधता कायम ठेवली. परंतु अटकेसह जबरदस्तीच्या कृतींपासून संरक्षण प्रदान केले. तज्ञांनी अधोरेखित केले की हा निर्णय कर अंमलबजावणीतील एक महत्त्वपूर्ण घडामोड आहे आणि कर दहशतवादाला आळा घालण्यास मदत करेल. मुख्य न्यायाधीश संजीव …
Read More »भूसंपादनाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर असल्याचे निरीक्षण; ठोठावला दोन लाख रुपयांचा दंड
साधारणतः १९४७-४८ मधील भूसंपादन प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली. ही याचिका म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर असल्याचे आणि याचिकाकर्त्यांचे दावे परस्परविरोधी, हरवलेल्या नोंदींचा गैरवापर करण्यासाठी केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच याचिकाकर्त्यांना आठ आठवड्यांमध्ये ही दंडाची रक्कम ससून रुग्णालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे इथे भरण्याचे आदेश दिले. स्वतःला व्यावसायिक म्हणणाऱ्या याचिकाकर्त्यांनी १९९३ मध्ये पुण्यातील …
Read More »२६/११ च्या दहशतवादी हल्ल्या प्रकरण: फहीम अन्सारीची उच्च न्यायालयात धाव वैयक्तिक व्यवसायासाठी पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्राची मागणी
मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणातून निर्दोष सुटका झालेल्या फहीम अन्सारीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रिक्षा चालवून उदरनिर्वाह करण्यासाठी पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्र (क्लिअरन्स सर्टिफिकेट) मिळावे, अशी मागणी अन्सारीने याचिकेतून केली आहे. विशेष न्यायालयाने मे २०१० मध्ये या प्रकरणातील एकमेव पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला दोषी ठरवले होते. परंतु, पुराव्याअभावी या प्रकरणातील …
Read More »सना मलिकच्या आमदारकीला आव्हान; उच्च न्यायालयाची विचारणा, निवडणूक आयोग ? उच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना विचारणा
महाराष्ट्रतील विधानसभा निवडणुकीत मुंबईतील अनुशक्तीनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सना मलिक यांच्या आमदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेत निवडणूक आयोगाला पक्ष का बनवण्यात आले नाही?, असा प्रश्न उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारला. उच्च न्यायालयात वकील महेंद्र भिंगारदिवे यांनी सना मलिक यांच्या विजयाला आव्हान देणारी याचिका केली. शिवसेना (युबीटी) खासदार अनिल देसाई यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या …
Read More »गुन्हा रद्द करा; अभिनेता समिक्षक कमाल खानची उच्च न्यायालयात धाव दोन्ही खटल्यांमधील गुन्हे रद्द करण्याची केली मागणी
आपल्याविरूद्ध अनुक्रमे २०१८ आणि २०२४ मध्ये दाखल केलेले गुन्हे रद्द करावे, अशी मागणी करणारी याचिका चित्रपट अभिनेता आणि समीक्षक कमाल खानने उच्च न्यायालयात केली. आपण निर्दोष असून खोट्य़ा प्रकऱणात आपल्याला गोवण्यात आल्याचा दावा कमाल खानने याचिकेतून केला आहे. उच्च न्यायालयात दाखल याचिकेत समाजमाध्यमांवर अभिनेता धनुष आणि त्याच्या सहकलाकारांविरुद्ध अपमानास्पद टिपण्णी …
Read More »दोषी राजकारण्यांवर आजीवन बंदी सर्वोच्च न्यायालयात याचिका, केंद्र म्हणते… सहा वर्षासाठीच बंदी ठिक
दोषी ठरलेल्या राजकारण्यांना निवडणूक लढवण्यास आजीवन बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकांना विरोध करत, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात असे सादर केले आहे की त्यांची अपात्रता सहा वर्षांपर्यंत मर्यादित करण्यात “मूळतः असंवैधानिक काहीही नाही”. सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात, केंद्राने म्हटले आहे की असे अनेक दंड कायदे आहेत जे शिक्षेची …
Read More »जयपूर-मुंबई एक्स्प्रेस गोळीबार प्रकरण : घटनेच्या तासभरआधी चेतनने समस्या सांगितली माजी आरपीएफ जवानाचा सत्र न्यायालयात दावा
जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये बेछूट गोळीबार करून वरिष्ठासह तीन प्रवाशांची हत्या केल्याच्या आरोपांखाली अटकेत असलेला रेल्वे पोलीस दलाचा (आरपीएफ) हवालदार चेतन सिंह चौधरीने घटनेपूर्वी काही तास आधीच त्याच्या आरोग्याच्या समस्येबाबत आपल्याला सांगितले होते. त्यापूर्वी, त्याने कधीच आपल्याला याबाबत सांगितले नसल्याचा दावा आरपीएफच्या माजी सुरक्षा अधिकाऱ्याने मंगळवारी दिंडोशी सत्र न्यायालयात केला. चेतनसिंहच्याविरोधात दिंडोशी न्यायालयात …
Read More »उच्च न्यायालयाचे निरिक्षण, आई स्वतःच्या मुलाला मारण्याचा विचार करू शकत नाही महिलेला जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाचे निरिक्षण
आपल्याच सात वर्षाच्या मुलाला प्रियकरासोबत मिळून मारहाण करण्याचा आरोप असलेल्या एका महिलेला नुकताच उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. कोणतीही आई आपल्या मुलाला मारण्याचा विचार करू शकत नाही, असे निरीक्षणही न्यायालयाने महिलेला जामीन मंजूर करताना नोंदवले. उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, तक्रारदार वडील आणि आरोपी आई (त्याची पत्नी) यांच्यात वैवाहिक वाद …
Read More »काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना दिल्ली न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा शीख दंगलीत वडील आणि मुलाच्या हत्ये प्रकरणी सुनावली शिक्षा
१९८४ च्या शीखविरोधी दंगलींमध्ये वडील-मुलाच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेले काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना मंगळवारी एका विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली [राज्य सरकार विरुद्ध… सज्जन कुमार]. १२ फेब्रुवारी रोजी सज्जन कुमार यांना दोषी ठरवणाऱ्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी ही शिक्षा सुनावली. न्यायालयाने कुमारला मृत्युदंडाची शिक्षा देण्याची सरकारी वकिलांची आणि तक्रारदाराची …
Read More »
Marathi e-Batmya