सुशांत बरोबर असलेल्या नात्यावर प्रथमच बोलली अंकिता सुशांत च्या आठवणीत भरून आले अंकिताचे डोळे

सुशांत राजपूत याची पूर्व प्रेयसी अंकिता लोखंडे पती विकी जैनसोबत बिग बॉसच्या घरात सामील झाली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने तिच्या आणि सुशांत सिंग राजपूतच्या ब्रेकअपविषयी खुलासा केला होता. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने सुशांत सिंग राजपूतच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. सध्या बिग बॉस १७ च्या घरात अंकिता आणि विकीमध्ये भांडण होताना दिसत आहे. अंकिता आणि तिचा नवरा विकी यांच्यातील संबंध सध्या बिघडले आहेत.

अशातच अलीकडेच अंकिता शोमध्ये तिचा एक्स सुशांतबद्दल बोलताना दिसली आहे. सुशांतबद्दल बोलताना ती भावूक झाली. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये अंकिता लोखंडे अभिषेकसोबत सुशांत सिंग राजपूतबद्दल बोलताना दिसली होती. त्याच्याविषयी बोलताना अंकिताला अश्रू अनावर झाले. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर अंकिताला ट्रोल देखील केले जात होते. मात्र आता अभिनेत्रीचे चाहते तिला साथ देत आहेत.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री सुशांतबद्दल बोलताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री सुशांतबद्दल बोलताना म्हणते की, ‘तो नेहमी सगळ्यांना आनंदानं भेटायचा. सगळ्यांना मदत करायचा.’ हे बोलताना तिला स्वतःलाच वाईट वाटले. सुशांतचे कौतुक करताना अभिनेत्री पुढे म्हणाली की, ‘तो खूप मेहनती होता. त्याचा मला नेहमीच अभिमान वाटतो.’ असे सांगताना अंकिताच्या डोळ्यात पाणी आले. विकीचा मित्र अभिषेकही म्हणतो की, त्याच्याबद्दल कोणी बोलायला नको होते. पण अंकिताने त्यावर ‘मला सुशांतबद्दल बोलायला आवडते. तो माझ्या कुटुंबाचा एक भाग होता.’ असं उत्तर दिलं.

About Marathi E Batmya

Check Also

राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक रकमा, नाट्यनिर्मिती खर्च आणि दैनिक भत्त्यात दुपटीने वाढ सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची माहिती

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना नाटक सादर केल्यानंतर नाट्यनिर्मितीसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *