परिणीती चोप्रा

राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा लग्नानंतर पहिल्यांदाच आले मीडियासमोर राघव आणि परिणीतीच्या लग्नाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आदित्य ठाकरे उपस्थित होते.

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा २४ सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये विवाहबद्ध झाले. दोघांनी सोमवारी सकाळी लग्नाचे फोटो शेअर केले. यानंतर दोघेही पहिल्यांदाच मीडियासमोर आले आहेत. लग्नानंतर परिणीती आणि राघव उदयपूर सोडतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

फोटोग्राफर पापाराझीने हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये राघव चड्ढा पांढरा शर्ट आणि काळ्या पँटमध्ये दिसत आहे. परिणीतीने निळ्या जीन्सवर गुलाबी कफ्तान घातला आहे. परिणीती आणि राघव दोघेही खूपच सुंदर दिसत असून दोघेही लग्नानंतर पहिल्यांदाच मीडियासमोर आले होते.

 

 

आप नेते राघव आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती या वर्षाच्या सुरुवातीला मुंबईत एकत्र दिसले होते. यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली. या दोघांची मे महिन्यात दिल्लीत एंगेजमेंट झाली होती. यानंतर त्यांनी उदयपूरमध्ये लग्न केले. राघव आणि परिणीतीच्या लग्नाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी मनीष मल्होत्रा, सानिया मिर्झा, प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा देखील उपस्थित होत्या.

About Marathi E Batmya

Check Also

IffI2025

IFFI2025 : ५६ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात सुरू

आठ दिवसांचा ५६ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव IFFI गुरुवारी गोव्याची राजधानी पणजी येथे एका भव्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *