सुझान खानच्या वाढदिवसादिवशी प्रियकराची सूचक पोस्ट; तर पोस्टवर हृतिकने दिली ही प्रतिक्रिया सुझान खानच्या वाढदिवसादिवशी प्रियकराचा प्रेमाचा वर्षाव तर हृतिक रोशनची सूचक पोस्ट

अभिनेता हृतिक रोशन आणि पूर्व पत्नी सुजैन खान यांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नाच्या १४ वर्षानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता दोघेही आपापल्या परीने आयुष्य जगात आहे. घटस्फोटांनंतर सबा आझाद हिने हृतिकच्या आयुष्यात प्रवेश केला , तर सुझैनही अर्सलान गोनी याच्या बरोबर रिलेशनशिप मध्ये आहे.

आज सुझैनच्या वाढदिवसानिमित्त अर्सलानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यावर हृतिकनेही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या प्रेमाला ‘गोड’ असेही म्हटले जाते. सुझैन हीच प्रियकर अरसलान गोनीने व्हिडिओमध्ये अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याने आणि सुझान खानने एकत्र घालवलेल्या वेळेची ही एक झलक. तसेच, कॅप्शनमध्ये भावुक शब्दाने आपले प्रेम व्यक्त केले आहे.

सुझान खानने या व्हिडिओवर कमेंट केली की, ‘माय लव्ह माय लव्ह. तुम्ही माझे सर्वस्व आहात. मी या जगातील सर्वात भाग्यवान स्त्री आहे, विश्वाने अशी सर्वोत्तम भेट दिली आहे. सुझैनचा माजी पती हृतिक रोशननेही या पोस्टवर आपले प्रेम व्यक्त केले आहे. हृतिकने हार्ट इमोजी बनवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हृतिक आणि सुझानला दोन मुलगे आहेत, ज्यांच्यामुळे दोघेही अनेकदा एकत्र दिसतात.

हृतिक रोशनबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तो त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या सबा आझादला डेट करत आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसत आहेत. आता ते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करतात सध्या ही बॉलिवूड मधील गोंडस जोडी म्हणून ओळखली जाते.

About Marathi E Batmya

Check Also

IffI2025

IFFI2025 : ५६ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात सुरू

आठ दिवसांचा ५६ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव IFFI गुरुवारी गोव्याची राजधानी पणजी येथे एका भव्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *