अंकिता लोखंडे हिला पवित्र रिश्ता मालिकेसाठी मिळायचे एवढे मानधन बिगबॉसच्या घरात अंकिताने सांगितल्या स्ट्रगलच्या आठवणी

अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या बिग बॉस हिंदी मध्ये सहभाग घेतल्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. ‘बिग बॉस १७’मध्ये अंकिता पती विकी जैनबरोबर सहभागी झाली असून पाहिल्यादिवसापासून काँट्रॅव्हर्सीमध्ये असलेली अंकिता विकी यांची जोडी दिसून येते. अंकिताने टेलव्हिजन क्षेत्रात १७ वर्ष पूर्ण केले आहेत. बिग बॉसच्या घरात अंकिताने आत्तापर्यंत तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले असून सुशांत सिंह राजपूत बरोबर असलेल्या नात्यावर सुद्धा तिने भाष्य केले आहे.

बिगबॉस स्पर्धक मुनव्वर फारुखी याच्याशी बोलताना अंकिताने तिच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगितले. यावेळी बोलताना अंकिता म्हणाली, “एक काळ असा होता की माझ्याकडे खरोखर पैसे नव्हते. जेवण करु की ऑडिशनला जाऊ असा प्रश्न माझ्यासमोर होता. कारण आई-वडिलांकडे किती दिवस मी पैसे मागणार होते असे तिने मुनव्वर फारुखी याच्याशी बोलताना सांगितले

पुढे प्रथम मिळलेल्या मंधानाबद्दल बोलताना अंकिता म्हणाली की, जेव्हा मी ‘पवित्र रिश्ता’ मध्ये काम करत होते तेव्हा मला दररोज २००० रुपये मिळायचे. माझ्या खात्यात ५० हजार रुपये जमा झाल्यावर मला खूप आनंद झाला. पहिल्यांदा मी इतके पैसे होते. त्या काळात माझे आई-वडील माझी ताकद होते. माझ्या ब्रेकअपनंतरही माझे आई-वडील माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.

पवित्र रिश्ता हा बालाजी टेलिफिल्म्सच्या एकता कपूर द्वारे निर्मित २००९ साली प्रसारित झालेली हिंदी मालिका आहे, जी ०१ जून २००९ ते २५ ऑक्टोबर २०१४ या कालावधीत झी टीव्हीवर प्रसारित झाला. या मालिकेत अंकिता आणि सुशांत सिंह राजपूतन मुख्य भूमिका साकारली होती. अंकिता आणि सुशांतच्या जोडीला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. ऑनस्क्रिनप्रमाणे ऑफस्क्रिनही सुशांत अंकिता एकमेकांच्या प्रेमात पडले. सुशांतला चित्रपटात ब्रेक मिळाल्यानंतर या दोघांमध्ये ब्रेकअप झाले.

About Marathi E Batmya

Check Also

Mohe-Lagi-Lagan-SUN-Neo

सन निओची नवीन सादरीकरण, “मोहे लागी लगन”, सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करेल ज्योतिष आणि वास्तू दोषावर आधारीत मार्गदर्शन करणारी सिरीयल

सन निओ त्यांच्या प्रेक्षकांना “मोहे लागी लगन” हा शो घेऊन येत आहे. प्रसिद्ध ज्योतिषी भावना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *