मराठी ई-बातम्या टीम
देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर वाढताना दिसत आहे. सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. बॉलिवूड मधील अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. अभिनेता जॉन अब्राहम पाठोपाठ आता एकता कपूरला कोरोनाची लागण झाली आहे.
एकता कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. सर्व काळजी घेतल्यानंतरही माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्बेत ठिक आहे आणि माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी या आशायची पोस्ट शेअर केली. एकता कपूरने स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे.
दरम्यान राजकारणी आणि चित्रपट सृष्टीतील दिग्ग्जांना कोरोनाची लागण होत असल्याने या दोन्ही क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. एकता कपूर पूर्वी करीना कपूर खान, अमृता अरोरा, अर्जुन कपूर, अंशुला कपूर, रिया कपूर, करण बुलानी, मृणार ठाकूर, जॉन अब्राहम आणि इतर काही कलाकारांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यानंतर आता एकता कपूरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. चित्रपट सृष्टीलाही कोरोनाचा विळखा बसू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
Marathi e-Batmya