पद्मावतला टक्कर देत ‘पॅडमँन’ने बसविला जम पहिल्या तीन दिवसात ३९.५० कोटींचा गल्ला

मुंबई: प्रतिनिधी

संजय लीला भन्साळींच्या वादग्रस्त ‘पद्मावत’ या चित्रपटानंतर प्रदार्शित झालेला ‘पॅडमँन’ हा आणखी एक महत्त्वपूर्ण आणि मोठा चित्रपट मानला गेला. अक्षय कुमारसारख्या दिग्गज अभिनेत्याची मुख्य भूमिका आणि आर. बाल्कींसारख्या मातब्बर दिग्दर्शकाच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे मागील बऱ्याच दिवसांपासून जोरदार प्रमोशन सुरू होतं. त्यामुळे हा चित्रपट बॅाक्स ऑफिसवर कशा प्रकारे यश मिळवतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं.

अक्षयसह सोनम कपूर, राधिका आपटे आणि पाहुण्या कलाकारच्या भूमिकेतील अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने सजलेल्या ‘पॅडमँन’ने शुक्रवारी १० कोटी रुपयांचा गल्ला जमवत बॅाक्स ऑफिसवर आपलं खातं उघडलं.

सामाजिक आशयावर आधारित कथानक आणि कलाकारांच्या दर्जेदार अभिनयाच्या बळावर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या व्यवसायात वाढ झाली. शनिवारी या चित्रपटाने १३.५० कोटी रुपये कमवले. चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांनी तसेच समीक्षकांनी केलेल्या कौतुकाचा फायदा या चित्रपटाला झाला आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी ‘पॅडमँन’चा व्यवसाय आणखी वाढला. रविवारी ‘पॅडमन’च्या नावावर १६ कोटी रुपयांचा व्यवसाय जमा झाला. अशा प्रकारे प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसांमध्ये ‘पॅडमन’ने ३९.५० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. चित्रपट व्यवसायतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार प्रेक्षक स्वत:च ‘पॅडमन’चं प्रमोशन करीत असल्याने भविष्यातही या चित्रपटाला आणखी फाायदा होण्याची शक्यता आहे.

२५ जानेवारीला प्रदर्शित झालेला दीपिका पदुकोण, रणवीर सिंह आणि शाहिद कपूर यांचा ‘पद्मावत’ आता तिसऱ्या आठवड्यात पोहोचला आहे. पहिल्या आठवड्यात १६० कोटी रुपये आणि दुसऱ्या आठवड्यात ६५ कोटी रुपये कमावणाऱ्या ‘पद्मावत’ने तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी ३.५० कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी ६.५० कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी रविवारी १० कोटी रुपये कमवत आपल्या व्यावसायाचा आलेख चढता ठेवण्यात यश मिळवलं. तिसऱ्या वीकेंडला या चित्रपटाने २० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. आजतागायत या चित्रपटाने बॅाक्स ऑफिसवर एकूण २४५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. एकीकडे भारतात आजही ‘पद्मावत’ची धूम सुरू आहे, तर दुसरीकडे आमिर खानच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाने चीनमध्ये ७०० कोटी रुपयांचा व्यवसाय करीत एक अनोखा विक्रम केला आहे.

About Editor

Check Also

अभिनेता धर्मेंद्र मुंबईतील ब्रीच कँडीत दाखलः वैद्यकीय पथकाच्या निरिक्षणाखाली अभिनेत्री हेमा मालिनी यांची सोशल मिडीयातून माहिती

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी, अभिनेते-राजकारणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *