फिल्मीनामा

राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा २१ ऑगस्ट रोजी वरळीत होणार डोम एसव्हीपी स्टेडियममध्ये होणार नेत्रदीपक पुरस्कार सोहळा

मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा समजला जाणारा राज्य शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा यंदा वरळीच्या डोम एसव्हीपी स्टेडियममध्ये २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर …

Read More »

मराठीसाठी ‘वाळवी’ या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार तर ‘'मर्मर्स ऑफ द जंगल' ला सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार जाहीर

‘ वाळवी ’ या चित्रपटाला मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा, ‘मर्मर्स ऑफ द जंगल या माहितीपटाला नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार, “आणखी एक मोहेन्जो दडो” या माहितीपटाला सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण, संकलन चित्रपटाचा, ‘वारसा’(लेगसी)’ या माहितीपटाला सर्वोत्तम कला-संस्कृती चित्रपटाचा तर सर्वोत्तम निवेदन आणि आवाजासाठी सुमंत शिंदे यांना आज राष्ट्रीय …

Read More »

यंदाचा व्ही शांताराम पुरस्कार शिवाजी साटम, तर राज कपूर पुरस्कार आशा पारेख यांना जाहिर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली पुरस्काराची घोषणा

यंदाचा २०२३ सालचा महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने देण्यात येणारा स्व. व्ही शांताराम आणि स्व. राज कपूर यांच्या नावे देण्यात येणारा पुरस्कार या हिंदी-मराठी चित्रपटासृष्टीतील अभिनेते शिवाजी साटम यांना आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम अभिनेत्री आशा पारेख यांना जाहिर करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज एक्स या …

Read More »

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ चा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर तर ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजयजी महाराज पाचपोर यांना जाहीर

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर आज करण्यात आले. सन २०२४ च्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. यासोबतच, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव …

Read More »

दाक्षिणात्य व्यक्तिरेखा साकारणार हार्दिक जोशी आगरी - कोळी भाषेचा जलवा दाखवणारा, ॲक्शनपट 'बाबू'

सध्या जोरदार चर्चेत असलेला, आगरी – कोळी भाषेचा जलवा दाखवणारा, ॲक्शनपट ‘बाबू’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अंकित मोहनच्या अभिनयाचे कौतुक होत असतानाच आता या चित्रपटातील एक सरप्राईस एलिमेंट समोर आला आहे. या चित्रपटात रांगड्या राणाच्या म्हणजेच हार्दिक एक महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून दाक्षिणात्य व्यक्तिरेखा साकारणारा हार्दिक या चित्रपटात प्रथमच नकारात्मक …

Read More »

‘बॉर्डर 2’मधून आयुष्मान खुराना बाहेर? लोंगेवालाच्या लढाईवर आधारित 'बॉर्डर' चित्रपट

१९७१ च्या भारत पाक युद्धातील निर्णायक लोंगेवालाच्या लढाईवर आधारित ‘बॉर्डर’ हा चित्रपट १९९७ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता. यानंतर सनी देओलने यावर्षी ‘बॉर्डर-2’ची घोषणा केली होती. त्यामुळेच अनुराग सिंग दिग्दर्शित ‘बॉर्डर’च्या सीक्वलमध्ये आयुष्मान खुराना महत्त्वाच्या भूमिकेत दिसण्याची अपेक्षा होती. मात्र, आता अभिनेत्याने हा …

Read More »

करिअरमुळे भंगले कपूर घराण्याचे सून होण्याचे स्वप्न, अभिनेत्री मुमताजची अधुरी प्रेम कहाणी आयुष्यात सर्व काही सर्वोत्कृष्ट हवे असे म्हणणारी मुमताज १९७४ मध्ये युगांडाचा उद्योगपती मयूर माधवानी यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली. पण, इथेही तिच्या नशिबी प्रेम नव्हते.

वयाच्या ११ व्या वर्षी बालकलाकार म्हणून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अनेक चित्रपटांत तिने लहान भूमिका केल्या. पण, परिणाम असा झाला बी ग्रेडची अभिनेत्री अशी तिची ओळख निर्माण झाली. त्यामुळे अनेक अभिनेत्यांनी तिच्यासोबत काम करण्यास नकार दिला. एकदा तिने डोळे बंद केले खूप विचार केला. सगळे देवाच्या हातात आहे असे …

Read More »

भारताचा पहिला कॉमेडी किंग कोण? जॉनी वॉकर, मेहमूद की चार्ली चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या लोकांना मोठ्या अडचणींचा सामना

हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला कॉमेडियन स्टार म्हणून त्यांच्या नावाची नोंद आहे. लहानपणापासून त्यांनी कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. मुंबईमध्ये एक छत्री बनवण्याच्या दुकानात त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत होते. पण, कामापेक्षा त्यांना सिनेमावर अधिक लक्ष केंद्रित करत होते. एके दिवशी ते थेट बॉम्बेच्या प्रसिद्ध इंपिरियल फिल्म …

Read More »

वर्षभरानंतर सापडला राजेश खन्नाच्या नायिकेचा सांगाडा कुटुंबासह झाली होती बेपत्ता

निर्मात्यांनी तिला मोठी रक्कम देऊन चित्रपटासाठी साईन केले होते. पण, ती अचानक गायब झाली. निर्माते चिंताग्रस्त झाले. निर्मात्यांचे पैसे घेऊन फरार झाल्याचा आरोप तिच्यावर होऊ लागले. मात्र, तपास सुरू झाला तेव्हा धक्कादायक बाबी पुढे आल्या. केवळ तीच नाही तर सुट्टीवर गेलेले तिचे संपूर्ण कुटुंब बेपत्ता होते. त्या अभिनेत्रीचा जन्म मुंबईत …

Read More »

‘तंगलान’ चित्रपटाचा KGF इतिहास आणि भारतीय पौराणिक कथांशी संबंध

चियान विक्रम स्टारर ‘तंगलान’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रभावी, रहस्यमय आणि जादुई जगाची झलक देतो. चियान विक्रमचे अप्रतिम परिवर्तन आणि दिग्दर्शक पा. रणजीतच्या शानदार दिग्दर्शनामुळे हा ट्रेलर अप्रतिम आहे. या ट्रेलरमुळे चित्रपटाच्या कथेबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. अहवालानुसार, हा चित्रपट KGF (कोलार …

Read More »