Breaking News

“गोविंदाच्या बंदूकीतून मिस फायर” मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून विचारपूस घरातील कपाटात बंदूक ठेवताना खाली पडल्याने झाली मिसफायर

सकाळी कोलकत्त्यासाठी घरातून निघण्याची तयारी करत असलेल्या अभिनेता गोविंदाच्या बंदूकीतून घरातच मिसफायर झाली. या मिसफायरमध्ये अभिनेता गोविंदाच्या पायाला जखम झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या दुर्घटनेनंतर अभिनेता गोविंदा याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अभिनेता गोविदांची विचारपूस केली.

मंगळवारी सकाळी अभिनेता-राजकारणी गोविंदाच्या पायात त्यांच्या बंदूकीतून चुकून गोळी लागली. त्यानंतर अभिनेता गोविंदा याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने गोविंदाला तातडीने रूग्णालयात हलवले. गोविंदावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती मुंबई पोलिस अधिकाऱ्याने दिली.

अभिनेता गोविंदा कोलकात्यासाठी जाण्यासाठी सकाळी तो आपली बँग भरत होता. त्यावेळी सोबत असलेली बंदूक कपाटात ठेवताना ती खाली पडली आणि त्यावेळी हा अपघात झाला. त्यांच्या परवानाधारक बंदूक कपाटात ठेवताना बंदूकीतून गोळी मिसफायर झाली. त्यात गोविदांच्या पायाला गोळी लागली. त्यानंतर अभिनेता गोविंदा यास रूग्णालयात नेऊन उपचार सुरु केले असून गोविंदाच्या पायातून गोळी बाहेर काढण्यात आल्याची माहिती अभिनेता गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी सांगितले.

यासंदर्भात अभिनेता गोविंदाने अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. अभिनेता गोविंदा (वय वर्षे ६०) यांना जवळच्या क्रिटिकेअर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते आणि ते आता आपल्या निवासस्थानी परतले असल्याचेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता गोविंदा यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यासोबत झालेल्या अपघातातबाबत विचारपूस केली. राज्य शासन व जनतेच्यावतीने लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या.

अभिनेता गोविंदा आणि त्यांच्या कुटुंबियांना या कठीण काळात सर्व आवश्यक मदत मिळेल याची खात्री मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. तसेच आमच्या सदिच्छा आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत असल्याचेही सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत