मलायका आरोराच्या वडीलांनी केली आत्महत्याः इमारतीच्या टेरेसवरून मारली उडी आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी बुधवारी मुंबईतील वांद्रे येथील इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून अद्याप कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

आत्महत्येमागील संभाव्य कारण अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही. ही घटना घडली तेव्हा अभिनेत्री मलायका अरोरा पुण्यात होती आणि आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर ती मुंबईत तिच्या घरी परतली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आत्महत्येच्या वृत्त समजल्यानंतर शोक व्यक्त करण्यासाठी बॉलिवूड कलाकार, मलायकाचे कुटुंबीय, तिचा माजी पती अरबाज खान यांच्यासह इतर काहीजण तिच्या घरी पोहोचले.

मूळचे पंजाबचे असलेले अनिल अरोरा यांनी मर्चंट नेव्हीमध्ये काम केले होते. मलायका अरोरा ११ वर्षांची असताना तिचे पालक वेगळे झाले. ती आणि तिची धाकटी बहीण, अमृता अरोरा, जी त्यावेळी ६ वर्षांची होती, त्यांचे संगोपन त्यांच्या आईने, जॉयस पॉलीकार्पने केले.

मलायकाने अभिनेत्री, मॉडेल, डान्सर आणि व्हिडिओ जॉकी म्हणून इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला. तिने कांटे आणि ईएमआय सारख्या चित्रपटात काम केले आहे. तिने छैय्या छैय्या, गुर नालो इश्क मीठा, माही वे, काल धमाल आणि मुन्नी बदनाम यांसारख्या गाण्यांमध्येही आपले नृत्य कौशल्याचे सादरीकरण करत अदाकारीही सादर केली.

About Editor

Check Also

ऐश्वर्या रॉय बच्चनला आयकर कर खटल्यात मिळाला विजय ४ कोटी रूपयांचा कर वाचला

आयकर अपीलीय न्यायाधिकरण (ITAT) मुंबईने ४ कोटी रुपयांच्या परवाना रद्द करण्याच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ऐश्वर्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *