प्रियंका चोप्रा बनली नंबर वन! स्कोर ट्रेंड्स इंडियावर नंबर वन बनली

मुंबई : प्रतिनिधी

अभिनेत्री प्रियांका चोप्राची सध्या चांगलीच चलती आहे. हिंदी सिनेसृष्टीसोबतच हॅालिवुड आणि अमेरिकन वाहिन्यांवरील शोमुळे प्रियांकाचं नाव सध्या जगभराता गाजत आहे. अशातच प्रियांकाने स्कोर ट्रेंड्स इंडियावरही बाजी मारली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियावर प्रियांका नंबर वन बनली आहे.

भारतीय सिनेसृष्टीतील अंतरराष्ट्रीय आयकन प्रियंका नेहमीच दर्जेदार काम करते. त्यामुळेच तिची फक्त देशातच नाही तर परदेशातही खूप मोठी फॅनफॉलोविंग आहे. याच कारणामुळे तिने स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री असण्याचा मान प्रियंकाने पटकावला आहे. सलमान खानसोबतच्या ती करत असलेल्या ‘भारत’ या सिनेमाची घोषणा झाल्यावर गेल्या काही दिवसांमध्ये प्रियंका मीडियाच्या प्रत्येक व्यासपीठावर चर्चेचा विषय बनली आहे. कायम लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या सलमानमुळेच त्याच्यासोबतच्या चित्रपटाच्या घोषणेने प्रियंकाला डिजीटल आणि सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रेंडिंग सेलिब्रिटी बनवलं आहे.

स्कोर ट्रेंड्सच्या यादीत प्रियांका मागोमाग आलिया भट्ट दुसऱ्या स्थानी विराजमान असून, सोनम कपूर तिसऱ्या आणि दीपिका पदुकोण चौथ्या स्थानी आहे. अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाच्या वतीने ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे. गेल्या आठवड्याअखेर जाहिर झालेल्या आकडेवारीनुसार, प्रियांकाला एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्याअखेरीस ८७.४३ गुण मिळाले होते, तर आलियाला ५४.६७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल यांच्या म्हणण्यानुसार प्रियांका सोशल मीडियावर भरपूर लोकप्रिय आहे. ट्विटर, फेसबुक, डिजिटल न्यूज, ब्रॉडकास्ट, व्हायरल न्यूज आणि सगळ्या प्रिंट प्रकाशनांमध्ये चर्चेत राहिलेल्या प्रियांकाला ८७.४३ गुणांसह बॉलीवुडची सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी होण्याचा मान मिळाला आहे.

१४ भारतीय भाषांमधील ६०० हून अधिक बातम्यांच्या स्रोताच्या माध्यमातून ही माहिती गोळा केली जाते. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश असतो.

About Editor

Check Also

ऐश्वर्या रॉय बच्चनला आयकर कर खटल्यात मिळाला विजय ४ कोटी रूपयांचा कर वाचला

आयकर अपीलीय न्यायाधिकरण (ITAT) मुंबईने ४ कोटी रुपयांच्या परवाना रद्द करण्याच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ऐश्वर्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *