शिल्पाचा पती अखेर अडीज वर्षाच्या प्रतिक्षेनंतर दिसला विना मास्क राज कुंद्राने स्वत:च्याच आयुष्यावर बनवला सिनेमा म्हणाला की,

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योजक राज कुंद्रा पॉर्न चित्रपटाच्या प्रकरणावरून चांगलाच चर्चेत आला होता. तसेच या प्रकरणात तो तीन महिण्यासाठी जेलची वारी सुद्धा करून आला आहे. मात्र आता राज कुंद्राही अभिनयात पदार्पण करत आहे. राज कुंद्राच्या ‘UT 69′ हा सिनेमा येत आहे ज्याचं ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झालं. हा सिनेमा म्हणजे राज कुंद्राच्या खऱ्या आयुष्यावरच आधारित आहे.

२०२१ मध्ये राज कुंद्रा पोर्नोग्राफी केस प्रकरणी अटकेत होता. तीन महिने त्याला तुरुंगावासा भोगावा लागला. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली.’UT 69′ सिनेमात तो स्वत:वर झालेल्या आरोपांवर बोलताना दिसणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलर रिलीजसाठी मुंबईत खास इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. दोन वर्षांपासून मास्क घालून फिरत असलेल्या राज कुंद्राने या इव्हेंटमध्ये सर्वांना आपला चेहरा दाखवला. तसंच त्याने माध्यमांशी मनमोकळा संवाद साधला.

राज कुंद्राने शिल्पाला सिनेमाविषयी सांगितले तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती. यावर राज कुंद्रा म्हणाला,’मी शिल्पाला स्क्रीप्ट ऐकवली आणि तिच्या उत्तराची वाट बघत होतो. माझी तिच्याजवळ उभी राहायची हिंमत नव्हती मी दूर उभा राहिलो. मी जसं मागे वळून बघितलं माझ्या तोंडावर चप्पल येऊन लागली. तेव्हा मला वाटलं की आता काही हा सिनेमा होत नाही. तरी दिग्दर्शक शहनवाज यांना शिल्पाशी बोलायला सांगितले. कारण मी तिला समजवण्यात अपयशी ठरलो.’

शिल्पाने दिग्दर्शकाला विचारलं हा अभिनय करु शकेल का? तेव्हा मी म्हटलं की हो हो मी मेथर्ड अॅक्टिंग करुन आलो आहे जेलमधून सगळं शिकून आलो आहे. करेन मी. तेव्हा कुठे ती तयार झाली अशी माहिती एका इव्हेंटमध्ये राज कुंद्राने दिली होती आता या चित्रपटाची सर्व वाट पाहत असून राज कुंद्रावर झालेले आरोपाची खरी कहाणी समोर येणार आहे.

About Marathi E Batmya

Check Also

ऐश्वर्या रॉय बच्चनला आयकर कर खटल्यात मिळाला विजय ४ कोटी रूपयांचा कर वाचला

आयकर अपीलीय न्यायाधिकरण (ITAT) मुंबईने ४ कोटी रुपयांच्या परवाना रद्द करण्याच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ऐश्वर्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *