गोड चेहऱ्याची यामी दिसणार अॅक्शन भूमिकेत बत्ती गुल मीटर चालू मध्ये साकारणार वकील

मुंबई : प्रतिनिधी

कन्नड, पंजाबी आणि तेलुगु चित्रपटानंतर हिंदीकडे वळलेल्या अभिनेत्री यामी गौतमने आज हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘विकी डोनर’ या चित्रपटात आयुष्मान खुराणासोबत जोडी जमवत बॅालिवुडमध्ये दाखल झालेल्या यामीने अल्पावधीतच हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. विशेषत: ‘बदलापूर’, ‘काबील’ आणि ‘सरकार ३’ मधील यामीच्या व्यक्तिरेखा कौतुकास पात्र ठरल्या. आजवर नेहमीच विविधांगी भूमिका साकारण्याला प्राधान्य देणारी ग्लॅमरस यामी प्रथमच अॅक्शन भू्मिकेत दिसणार आहे. एरव्ही डान्स आणि कोणत्या ना कोणत्या तरी वर्कशॅाप्समध्ये बिझी असणाऱ्या यामीने सध्या फिजीकल फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं आहे.

‘बत्ती गुल मीटर चालू’ या आगामी हिंदी चित्रपटात यामीने एका वकीलाची भूमिका साकारली आहे. याखेरीज ती सध्या आणखी एका आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहे. या चित्रपटात यामीचं एक नवं रूप प्रेक्षकांना पाहायला मिळेल असं या चित्रपटाशी निगडीत असलेल्या सूत्रांचं म्हणणं आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार यामी प्रथमच अॅक्शन भूमिका साकारत असून, सध्या ती यासाठी कसून मेहनत घेतेय. या चित्रपटाबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात आहे. यामीसुद्धा याबाबत चकार शब्द सांगायला तयार नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार एका निनावी आगामी चित्रपटासाठी यामी सध्या जिममध्ये जाऊन ट्रेनिंग घेतेय. या चित्रपटातील प्रत्येक सीन आत्मविश्वासाने आणि बेधडकपणे करता यावा यासाठी तिची तयारी सुरू आहे. सध्या तरी या चित्रपटाबाबत फार काही सांगण्यात येत नसलं तरी लवरकरच यान्रवरून पडदा उठेल.

About Editor

Check Also

अभिनेता धर्मेंद्र मुंबईतील ब्रीच कँडीत दाखलः वैद्यकीय पथकाच्या निरिक्षणाखाली अभिनेत्री हेमा मालिनी यांची सोशल मिडीयातून माहिती

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी, अभिनेते-राजकारणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *