नवीन वर्षात पीपीएफ, लहान योजनांवर मिळणार कमी व्याज ०.२० टक्क्याने केली कपात

नवी दिल्लीः प्रतिनिधी

केंद्र सरकारने लहान बचत योजनांवरील व्याजदरात ०.२० टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या जानेवारी – मार्च तिमाहीत पोस्टातील लहान बचत योजनांवर कमी व्याज मिळणार आहे. याशिवाय केंद्र सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी योजनेवरीलही व्याजदर ०.२० टक्क्यांनी कमी केले आहेत. पाच वर्ष मुदतीच्या वरिष्ठ नागरिकांनी लहान बचतींवरील व्याजदरात मात्र काहीच बदल केलेला नाही.

याअगोदर सरकारने जुलै – सप्टेंबर या तिमाहीसाठी लहान बचतींवरील व्याजदर ०.१० टक्क्यांनी घटवला होता. तर ऑक्टोबर – डिसेंबर तिमाहीचा व्याजदर बदललेला नव्हता. केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी व्याजदराचा आढावा घेते.

 

 

       व्याजदरातील बदल

योजना                                             नवीन दर         जुना दर

पीपीएफ                                              ७.६%               ७.८%

किसान विकास पत्र                               ७.३ %             ७.५ %

सुकन्‍या समृद्धी योजन                            ८.१%              ८.३ %

वरिष्ठ नागरिक बचत योजना                   ८.३%              ८.३%

 

About Editor

Check Also

विप्रोच्या एआयमुळे २०,००० कर्मचाऱ्यांच्या उत्पादनाइतकी उत्पादकता वाढली नोकर भरती आणि सॉफ्टवेअर विकास आणि कराराचे स्वरूप बदलतोय

विप्रोच्या एआय (AI) उपक्रमांमुळे २०,००० कर्मचाऱ्यांच्या उत्पादनाइतकी उत्पादकता वाढली आहे, ज्यांना नंतर भारतीय आयटी फर्ममध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *