खुषखबर: कोरोनावरील रेमडेसिवीर औषध आता भारतातही तयार होणार सिपला आणि हेटरो या दोन कंपन्यांना परवानगी

मुंबई: प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तसेच या विषाणूमुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने बांग्ला देशातून १० हजार औषधांचे डोस मागविण्याचा निर्णय घेतला. परंतु आता कोरोनावरील रेमडेसिवीर हे औषध भारतात तयार करण्यास देशाच्या औषधी नियंत्रण विभागाने मंजूरी दिली. त्यामुळे या औषधाची निर्मिती आणि विक्री देशात करता येणार आहे.
हे औषध सिपला आणि हेटरो या दोन कंपन्यांना बनविण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे देशातील अनेक कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचणार असून रूग्णही बरे होण्यास मदत होणार आहे. दरम्यान बांग्लादेशातून कोरोनावरील हे औषध आता मागविण्यात येणार नाही.

 

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांच्या स्टार रेटिंग प्रणालीचा उपयोग दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी व्हावा

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांच्या स्टार रेटिंग प्रणाली या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *