मध्य रेल्वेच्या ठाणे येथील प्लॅटफॉर्म ५ च्या वाढीसाठी आणि सीएसटी येथील दोन प्लॅटफॉर्मच्या वाढीसाठी ६३ तासांचा स्पेशन ब्लॉक मध्य रेल्वेने ३० मे च्या मध्यरात्रीपासून जाहिर केला होता. तसेच हा स्पेशल ब्लॉक २ तारखेला दुपारी २ वाजेपर्यंत राहणार असल्याचे जाहिर केले होते. मात्र स्पेशल ब्ल़ॉकची वेळ संपण्यापूर्वीच मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म वेळे आधीच पूर्ण केल्याने दुपारी साधारणतः १ वाजण्याच्या सुमारात टिटवाळाच्या दिशेने पहिली लोकल सीएसएमटीहून सोडल्याची एक चित्रफित मध्य रेल्वेने जारी केली.
या ६३ तासांच्या स्पेशल ब्लॉकमध्ये सीएसएमटी येथील दोन प्लॅटफॉर्मवाढीचे तर ठाणे येथील एका प्लॅटफॉर्म वाढीचे काम करण्यात येणार होते. याशिवाय येथील रेल्वे लाईन ट्रॅकचेही काम करण्यात येणार होते. ते कामही या वेळे आधी पार पडले. मध्य रेल्वेच्या यासाठी स्पेशल ब्लॉक घेताना मुंबईतील जवळपास अनेक कार्यालयांशी संपर्क साधून साधारणतः तीन दिवस घरून काम करून घेण्याचे आवाहन केले. किंवा या तीन दिवसाची सुट्टी देण्याचे आवाहन केले. त्यानुसार अनेक खाजगी आणि शासकिय कार्यालयांनीही कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे कर्मचाऱ्यांना सांगितले.
विशेष म्हणजे मध्य रेल्वेच्या या कालावधीत अर्थात ६३ तासांच्या या स्पेशल ब्लॉकच्या कालावधीत तमाम मुंबईकरांनी रेल्वे उपनगरीय गाड्यांचा वापर करण्याऐवजी पर्यायी वाहनांचा वापर केला. मात्र अनेकांनी स्वतःच्या दारात आणि पार्किंगमध्ये ठेवलेल्या गाड्या रस्त्यावर काढल्याने शुक्रवार आणि शनिवारी मोठ्या प्रमाणावर वाहतूकीची कोंडी झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले.
परंतु आता मध्य रेल्वेने स्पेशल ब्लॉकसाठी घेतलेल्या मुदती आधीच काम पूर्ण करून उपनगरीय रेल्वे गाड्या सोडण्यास सुरुवात केल्याने दुपारपासून उपनगरीय गाड्यांचे कोलमडलेले वेळापत्रक पूर्वपदावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय उद्या जून महिन्याचा पहिला सोमवार येत असल्याने तमाम मुंबई करांना कामावर जाण्याची घाईही राहणार आहे. मध्य रेल्वेचा स्पेशल ब्लॉक संपला असल्याने आता लोकलने मुंबईकरांना वेळेत पोहचता येणे शक्य होणार आहे.
https://x.com/Central_Railway/status/1797181683755888651
Marathi e-Batmya