१३ जणांचे बळी गेल्यानंतर महाराष्ट्र भूषण डॉ धर्माधिकारी यांनी व्यक्त केल्या आपल्या भावना घडलेली घटना अत्यंत क्लेशदायक

ऐन एप्रिलमध्ये बदलेल्या वातावरणामुळे नैसर्गिक तापमानात सातत्याने बदल घडून येत असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतरही नवी मुंबईतील खारघर येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्याला उपस्थित राहीलेल्या श्री सेविकांना उष्माघाताने त्रास होऊ लागला. त्यामुळे काल रात्रीत ११ श्री सदस्यांचा मृत्यू झाल्यानंतर आज दिवसभरात आणखी दोघांची वाढ होत ही संख्या १३ वर पोहोचली. त्यानंतर या घटनेबद्दल श्री परिवाराचे प्रमुख ज्येष्ठ निरूपमकार डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला २२ लाख श्री सेवकांनी हजेरी लावली. या घटनेवर आप्पासाहेब धर्माधिकारी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेल सारे श्री सदस्य हे माझ्या कुंटुबाचे सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे. माझ्या कुटूंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे, अशी भावना व्यक्त केली.

यावेळी पुढे बोलताना आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले, आपल्याच कुटुंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दुःख शब्दात व्यक्त करण्यापलिकडचे आहे. मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटूंबियांची आणि माझी वेदना सारखीच आहे. श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यानपिढ्यांची पंरपरा आहे. त्यानुसार आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत. यातील मृतांना सद्गती लाभो, तसेच त्यांच्या कुटूंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. झाला प्रकार दुर्दैवीच होता. त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे, असे आवाहनही यावेळी केले.

About Editor

Check Also

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर राज्य निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या एक दिवस आधी माहिती

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *