बेकायदा गँस वितरणप्रकरणी ९ एजन्सींच्या विरोधात गुन्हे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी

घरगुती गँस पुरवठा करणाऱ्या नळपाईप लाईनमधून अनधिकृतरित्या सिलेंडरमध्ये भरून त्याची विक्री केल्याप्रकरणी शहरातील ९ गँस एजन्सींच्या विरोधात जीवनाश्वक वस्तू अधिनियम १९५५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी विधानसभेत दिली.

मुंबई शहर व उपनगरात घरगुती गँस सिलेंडरच्या अवैध विक्री करणाऱ्या गँस एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी विधानसभेत शिवसेनेच्या आमदार तृप्ती सावंत, अजय चौधरी आणि काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. त्यास उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली.

अवैध पध्दतीने गँसची विक्री करणाऱ्यांच्या विरोधात मलबार हिल पोलिस ठाणे यांच्या हद्दीत पारशी आग्यारी, बँक ऑफ बडोदा कंपाऊंड, सिमला हाऊस कपांऊड, वाळकेश्वर रोड, मलबार हिल या ठिकाणी सिलेंडरची वाहतूक व डिलीव्हरी करणाऱ्या वाहनांमध्ये आढळून आले. यावेळी २५ सिलेंडर असलेली २ वाहने, एचपीचे २७ सिलेंडर असलेले १ वाहन अशी ३ वाहने आढळून आली. ती सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली असून यासंदर्भात मुंबईच्या विविध भागात छापे मारण्यात आले. यावेळी ६४ एजन्सीवर छापे मारण्यात आले. यापैकी ९ एजन्सीमध्ये अवैधरित्या गँसची विक्री करण्यात येत असल्याचे उघडकीस आले. त्या एजन्सींवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

About Editor

Check Also

मुंबईत एका महिलेने ताब्यात घेतलेल्या आंदोलकांच्या पोलिसांची व्हॅन अडवली सुरुवातीला एकटीने पोलिसांचे वाहन अडविले

पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी असलेली एक महिला, ताब्यात घेतलेल्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा मागचा दरवाजा उघडणारा एक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *