हर्षल रावतेच्या आत्महत्या प्रकरणानंतर सरकारला आली जाग अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी मंत्रालयात बसवली जाळी

मुंबई : प्रतिनिधी

गेली महिनाभर मंत्रालयात येवून आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे मंत्रालयातील आवारात उडी मारून आत्महत्या करू नये म्हणून जाळी बसविण्याचा निर्णय घेत त्याची प्रशासनाने अंमलबजावणीही केली.

धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर अहमदनगरचा अविनाश शेटे यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर स्वत:वर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चेंबूर येथील रहिवासी हर्षल रावते याने तर थेट मंत्रालयात येवून पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्यामुळे मंत्रालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.

मंत्रालयात येवून कोणीही अशाप्रकारचे कृत्य करू नये यासाठी मंत्रालयात दुसऱ्या माळ्यावर जाळी बसविण्यात आली आहे. यामुळे कोणी वैतागून आत्महत्येचा प्रयत्न केला, तरी तो यशस्वी होवू नये यासाठी ही जाळी बसविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

About Editor

Check Also

‘आयपीपीएआय’च्या राष्ट्रीय परिषदेत महावितरणचा सहा पुरस्कारांनी गौरव २६ व्या राष्ट्रीय रेग्युलेटर्स अॅण्ड पॉलिसीमेकर्स परिषदेत पुरस्काराचे वितरण

इंडिपेन्डंट पॉवर प्रोड्यूसर असोसिएशन ऑफ इंडियाच्या (IPPAI) २६ व्या राष्ट्रीय रेग्युलेटर्स अॅण्ड पॉलिसी मेकर्स परिषदेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *