मारहाण प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक

हर हर महादेव या सिनेमाचा शो बंद करताना एका प्रेक्षकास ठाण्यातील मॉलमध्ये मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. दरम्यान मला नोटीस घेण्यासाठी बोलवून बेकायदा अटक केली असा आरोप आव्हाड यांनी केला.

हर हर महादेव या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखविल्याचा आरोप करत आव्हाड यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका मॉलमधील शो बंद पाडला. यावेळी एका प्रेक्षकाने विरोध केला असता त्याला मारहाण केल्याचा आरोप आव्हाड यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली.

आव्हाड यांनी याबाबतची माहिती देत ‘शुक्रवारी दुपारी  एक वाजता मला वर्तकनगर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक निकम यांचा मला फोन आला आणि नोटीस नेण्यास बोलविले. नोटीस घेण्यासाठी माणुस पाठवितो असे सांगितले त्यानर त्यांनी तुम्ही स्वताच या असे सांगितले. पोलिस ठाण्यात गेल्यावर मला बोलण्यात गुंतवून ठेवत मला ताब्यात घेऊन अटक केली. यावेळी मला पोलिसांनी आपल्यावर वरून दबाव असल्याचे सांगितले.

हा पोलिसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेले नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही. अशी माहितीही जितेंद्र आव्हाड यांनीच दिली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, ‘नशामुक्त महाराष्ट्र’ला बळकटी देण्याचे काम दहीहंडीच्या उत्सवातून व्हावे वरळी, दादर, घाटकोपर येथे आयोजित विविध दहीहंडी उत्सवाना भेट

युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी योगदान द्यावे, यासाठी सामाजिक उपक्रमांना व्यापक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *