शरद पवार गट म्हणतो, माढा मतदारसंघात अजित पवारांची राष्ट्रवादी फुटणार

माढा लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरनं अजित पवारांची राष्ट्रवादी फुटणार असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला.

शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, माढ्याचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाहनावर गाजरांचा वर्षाव त्यांच्याच मतदारांनी केल्याचे चित्र महाराष्ट्राने पाहिलं. त्यातच फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर व त्यांच्या परिवाराचा सक्तविरोध खासदार निंबाळकर यांना असल्यामुळे ते वेगळी भूमिका घेतील असा दावा केला.

पुढे बोलताना महेश तपासे म्हणाले, अब की बार ३७० पार च्या घोषणा देणाऱ्यांची पहिली यादी घोषित होताच उमेदवार पवन सिंग यांनी माघार घेतली व माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दवाखान्याचे शटर उघडलं आणि राजकारणातून निवृत्ती जाहीर केली अशी टीकाही केली.

बॅलेटवर मतदान घेण्याचे धाडस मोदींमध्ये नाही

महेश तपासे म्हणाले की, प्रगत देशांमध्ये ईव्हीएम वर सरसकट बंदी आहे व बॅलेट वरच तिथे मतदान होत. पंतप्रधान मोदींनी खरंच जर भारतामध्ये गेल्या दहा वर्षात विकास केला असेल तर बॅलेट पासून त्यांना एवढी भीती कशासाठी? असा संतप्त सवाल करत वन नेशन वन इलेक्शन च्या माध्यमातून देशाची संसदीय लोकशाही प्रक्रिया मोडून काढण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप केला.

महेश तपासे पुढे बोलताना म्हणाले की, महायुतीमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची किंमत शून्य असल्याचे सांगत त्यामुळेच आठवले व्यथित आहेत. त्यांच्या पक्षाला एकही जागा महायुती सोडणार नाही व भविष्यात आठवले यांना राज्यसभेची संधी उपलब्ध होणार नाही असा दावाही यावेळी केला.

शेवटी बोलताना महेश तपासे म्हणाले की, बारामती लोकसभा मतदार संघात संसद महारत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून जनसामान्य जनता ही सुप्रिया सुळे यांच्या सोबत आहे. सुप्रिया सुळे चौथ्यांदा हा मतदारसंघ सर करतील हे निर्विवाद सत्य आहे असा ठाम विश्वासही यावेळी व्यक्त केला.

About Editor

Check Also

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर राज्य निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या एक दिवस आधी माहिती

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *