राज्यातील महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आता संपत आलेली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकिय पक्षांकडून आता त्यांच्या आघाड्या-बिघाड्या जाहिर करण्याची लगबग सुरु झाली आहे. तसेच प्रत्येक पक्षांकडून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आलेली असतानाच आता उमेदवारही जाहिर करण्यात येत आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची तर काँग्रेससोबत आघाडीत असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून ६ जागी उमेदवार करत त्यांची यादी जाहिर केली आहे.
काँग्रेस पक्षाकडून सुरुवातीलाच महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पार्टी पक्षासोबत आघाडी केली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीसोबतही आघाडी केली. तसेच वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसने ६२ जागा दिल्या आहेत.
विशेष म्हणजे आता उमेदवारी अर्ज भरण्यास आता काही तासांचा अवधी शिल्लक राहिलेले असतानाच काँग्रेस पक्षासह आघाडीतील इतर पक्षांकडूनही उमेदवारांच्या याद्या जाहिर करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आवाहन निश्चित करण्यात आलेल्या उमेदवारांना काँग्रेस पक्षासह आघाडीतील पक्षांना केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ७ उमेदवार जाहिर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी त्यांच्या पक्षाच्यावतीने ७ उमेदवारांची यादी जाहिर आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबईत पुन्हा एकदा आपली ताकद दाखविण्यात येणार आहे.
पक्षाचे मुंबई विभागीय निवडणूक प्रभारी अध्यक्ष श्री. मिलिंद कांबळे आणि सहअध्यक्ष श्री. सोहेल सुभेदार यांच्या मान्यतेने 'बृहन्मुंबई महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६' साठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येत आहे. सर्व उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा! pic.twitter.com/PS4cG2wnuc
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) December 29, 2025
Marathi e-Batmya