मुख्यमंत्री शिंदेचे आदेश, वर्षा बंगल्याच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना सोयी-सुविधा द्या ‘तोरणा’ बंगल्यात पोलिसांसाठी असलेल्या सुविधांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी

मुख्यमंत्र्यांचे शासकिय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ या निवासस्थान आणि मुख्यमंत्र्यांच्या संरक्षणासाठी बंदोबस्तावर सातत्याने पोलिस आणि अधिकाऱ्यांना तैनात रहावे लागते. या पोलिसांना कपडे बदलण्यापासून जेवण आणि नैसर्गिक विधीकरीता वर्षा शेजारीच असलेल्या तोरणा बंगल्यात तात्पुरती पोलिसांची व्यवस्था करण्यात आली. मात्र  ‘तोरणा’ बंगल्यात पोलिसांच्या संख्याबळाच्या तुलनेत फारशा सोयी-सुविधा नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बंगल्याची पाहणी करत बंगल्याचे नूतनीकरण करताना सुरक्षेसाठी तैनात पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी विविध सोयी -सुविधांची निर्मिती करावी, असे निर्देश दिले.

‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डावखर यांच्यासह तोरणा बंगल्याची पाहणी केली.

‘वर्षा’ आणि ‘तोरणा’ या शासकीय निवासस्थानी तैनात असलेल्या पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांना दर्जेदार सुविधा पुरविण्यावर मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष पुरवले असून या पोलीस – अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी अभ्यास कक्ष, दुमजली बेड (बंक बेड), वातानुकूलित यंत्रे, ध्यानधारणेसाठी कक्ष अशा सुविधांचे काम तात्काळ हाती घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि इतर सुविधा लवकरात लवकर पुरविण्याचे निर्देश देतानाच हे काम रेंगाळणार नाही याची दक्षता घेण्याच्याही सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.

About Editor

Check Also

भिवंडी येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीची आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखाची मदत

भिवंडी येथे घडलेल्या दुर्दैवी इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *