लोकसभा निवडणूकः पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात दुपारपर्यंत १९ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सूरु झाले. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सकाळी १२.०० वाजेपर्यंत १९.१७ टक्के मतदान झाले आहे.
पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

रामटेक १६.१४ टक्के

नागपूर १७.५३ टक्के

भंडारा- गोंदिया १९.७२ टक्के

गडचिरोली- चिमूर २४.८८ टक्के

चंद्रपूर १८.९४ टक्के

तर सकाळी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदार संघात

पहिल्या दोन तासात ७.२८ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सूरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात पहिल्या दोन तासात म्हणजे सकाळी ७.०० ते ९.०० वाजेपर्यंत ७.२८ टक्के मतदान झाले आहे.

पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

रामटेक ५.८२ टक्के

नागपूर ७.७३ टक्के

भंडारा- गोंदिया ७.२२ टक्के

गडचिरोली- चिमूर ८.४३ टक्के

चंद्रपूर ७.४४ टक्के

About Editor

Check Also

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व एसटी बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *