मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागात मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी करत २६-१२-२०२२ एमएमआरडीए MMRDAचे दोन पत्र यावेळी दाखविले. मेट्रोच्या लाइनचे गर्डर टाकण्याआधीच रंग काम केलं जातय . मेट्रो २अ आणि मेट्रो ७च्या रंगरंगोटीसाठीचा एमएमआरडीए MMRDAने एक पत्र दिलं आहे, त्यानंतर ४ ऑक्टोबर निविदा काढण्यात आली . ज्यामध्ये मेट्रो पोल आणि इतर भागांना रंगरंगोटी करण्यात येईल असं म्हटलं. ७४ कोटी रुपये काम होण्याआधी रंगरंगोटीसाठी खर्च केले जात असल्याचा आरोप करत त्यासाठी ७४ कोटी रुपये खर्च करताय, हे पैसे कॉन्ट्रॅक्टरच्या खिश्यात जातायत. काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा रंगरंगोटी करणार पुन्हा खर्च करणार आणि पैसे देणार असा हा घोटाळा असल्याचा आरोप शिवसेना उबाठाचे वरळी विधानसभेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी केला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘हे आत्ताचं सरकार कॉन्ट्रॅक्टरचे आहे, अदानीच आहे, मात्र धारावीकरांना आम्ही हक्काच घरं देऊ, पण अदानीचं टेंडर मात्र रद्द करू असा निर्धार यावेळी व्यक्त केला.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची मातोश्री येथे पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतून आदित्य ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला. आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा, अनेकांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. मात्र आम्ही राजवटीच्या विरोधात लढत आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी अधोरेखित केलं.
मागाठाण्याचे उमेदवार उद्देश पाटेकर यांच्या नावे चुकीचं पत्र फिरवलं जातय
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उद्देश पाटणकर यांच्या नवे एक पत्र फिरवलं जातय, या पत्रातून उद्देश पाटेकर यांनी शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा दावा केला जात आहे. मात्र हे पत्रक खोटं असून उद्देश पाटेकर यांनी पोलिसात या संदर्भात तक्रार दिलेली आहे. यावर बोलताना ‘जर या संदर्भात निवडणूक आयोगाने कारवाई केली नाही, तर आम्ही समजू भाजपाची भांडी निवडणूक आयोग घासत आहे, अशी टीकाही यावेळी केली.
शिवतीर्थावरील सभेत मन आणि हृदय सुद्धा रिकामं होतं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा शिवतीर्थावर पार पडली, या सभे विषयी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की ‘जिथे माझ्या आजोबांचं बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृति स्थळ आहे, त्या ठिकाणी त्यांची शिवतीर्थावर सभा घेण्याची हिंमत झाली. पण तिथे एवढी मोठी सभा आयोजित केली पण खुर्च्या रिकाम्या होत्या, फक्त खुर्च्या रिकाम्या नव्हत्या तर त्यांचं मन आणि हृदय सुद्धा रिकाम होतं’ असा उपरोधिक टीकाही यावेळी केली.
Marathi e-Batmya