आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल, स्वतःचा इमान विकणारे महाराष्ट्राचा मान काय राखणार?

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात दौरे करत आहेत. आज संभाजीनगर इथे आक्रोश मेळाव्याला आदित्य ठाकरे यांनी संबोधित केलं. यावेळी शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या भावनांशी खेळणाऱ्या सरकारचा आदित्य यांनी खरपूस समाचार घेतला.

राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही, राज्यातील उद्योग परराज्यात जात असल्यामुळे राज्यातून तरुणांचा रोजगार हिरावला जातोय. त्यामुळे या सरकारमधील मंत्र्यांना भेटतील तिथे “देता की जाता?” हे विचारा असं आवाहन केलंय.

महाराष्ट्र देशाला आजवर दिशा देत आलाय. महाराष्ट्रात देशाची आर्थिक राजधानी आहे, सुपीक जमीन आहे, कुशल तरुण आहेत. पण या राज्यातून प्रकल्प राज्यातून परत जातायत. पर राज्यात प्रकल्प जाण्याचं वाईट वाटत नाही, तर आपल्या राज्यातून प्रकल्प इथे न थांबता परराज्यात जातायत त्याचं वाईट वाटतंय. महाराष्ट्राने आवाज बुलंद केला नाही तर देश मागे जाईल. पण महाराष्ट्र पुढे गेला तर देशही पुढे जाईल. पण गद्दार ५० खोक्यात अडकलेत असं म्हणत स्वतःचा इमान विकणारे महाराष्ट्राचा मान काय राखणार? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना करत जनतेला एकत्र येण्याचं आवाहन केलंय.

गृहमंत्र्यांना आजवर एवढं हतबल पाहिलं नाही

राज्यातील प्रकल्प गेले तरी मोठा प्रकल्प राज्यात आणू म्हणणारे देवेंद्र फडणवीस ते आणू शकले नाहीत. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की ‘गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आजवर एवढं हतबल आजवर कधीही पाहिलं नाही. आजवर कायदा आणि सुव्यस्थेचा एवढा बोजवारा उडालेला पहिला नाही, असं म्हणत संभाजीनगर इथल्या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी सरकारमधील बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांचा समाचार घेतला आहे . राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. गद्दार आमदार म्हणतात चुन चुन के मारेंगे, खरं तर मागे पाठीत वार करणारे पळून जातात आणि म्हणतात चुन चुन के मारेंगे. तर कोणी पोलीस ठाण्यात गोळीबार करतं पण कारवाही होत नाही. तर काही मंत्री संविधानिक पदावर असणाऱ्या महिलेला अश्लील भाषेत शिविगाळ करतं, पण तरीही कोणतीही कार्यवाही न करता केवळ समज दिली जाते.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधांवर भर आगामी खासदार क्रीडा महोत्सव विदर्भस्तरीय, खासदार क्रीडा महोत्सवाची सांगता

नागपुरात व्यापक स्तरावर क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. या सोयी-सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *