खुशाल चौकशी करा म्हणणाऱ्या सोमय्यांच्या मुलाची न्यायालयात धाव अटकपूर्व जामीनासाठी केला अर्ज

काही दिवसांपूर्वी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी मोठ्या प्रमाणावर आरोप केले. त्यास प्रत्युत्तर म्हणून सोमय्या यांनी ठाकरे सरकारला आव्हान देत ठाकरे सरकारने खुशाल चौकशी करावी आम्ही न्यायालयात जाणार नाही असे ठणकावून सांगितले. मात्र त्यास ७८ तास उलटत नाही तोच सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतल्याची माहिती पुढे येत आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनंतर अटक टाळण्यासाठी नील सोमय्या यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. एकीकडे किरीट सोमय्या संजय राऊतांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा दावा करत असताना दुसरीकडे मात्र नील सोमय्या अटक टाळण्यासाठी न्यायालयात गेले आहेत. २३ फेब्रुवारीला त्यांनी ही याचिका दाखल केली असून नील सोमय्या यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत सोमय्या यांचे पुत्र नील यांच्या मालकीच्या निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शनमध्ये पीएमसी बँक घोटाळय़ातील आरोपी राकेश वाधवान हे भागीदार आहेत. या प्रकल्पासाठी सोमय्यांनी ४०० कोटींची जमीन साडेचार कोटींमध्ये विकत घेतल्याचा असल्याचा आरोप केला. तसेच बाप, बेटे जेलमध्ये जाणार असून कोठडीचं सॅनिटायजेशन सुरु असल्याचेही राऊत यांनी सांगितले होते.

४०० कोटींना मारा गोळी, निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शनचा प्रकल्प अगदीच छोटा असून त्यामध्ये पीएमसी बँकेतील एक पैसाही आलेला नाही. आम्ही दमडीचीही चूक केलेली नाही. आम्ही गैरव्यवहार केल्याचे पुरावे असतील तर ठाकरे सरकारने आमच्या विरोधात चौकशी करावी, त्याविरोधात न्यायालयातही जाणार नसल्याचे प्रत्युत्तर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी दिले होते.

सोमय्या यांनी सर्व आरोप पूर्णपणे फेटाळत नील वा माझा वाधवानशी संबंध नाही, पीएमसी बँकेशीही संबंध नाही. वास्तविक, पीएमसी बँकेतील घोटाळा मीच उघड केला होता. आम्हाला तुरुंगात टाकायचे तर खुशाल टाका. आम्ही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत, आम्ही घाबरत नसल्याचेही सोमय्यांनी सांगितले होते.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *