अजित पवार गटाच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदी धनंजय मुंडे तर प्रदेश प्रवक्ते राजेश विटेकर यांची नियुक्ती २२ जुलै रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या अजित पवार दौऱ्यावर-सुनिल तटकरे यांची माहिती

सोमवारी २२ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अहिल्यानगर दौरा निश्चित करण्यात आला असून या दौऱ्यात महिलांशी थेट संवाद साधणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

सकाळी पारनेर, दुपारी अहिल्यानगर शहर, श्रीगोंदा आणि संध्याकाळी कर्जत जामखेड याठिकाणी अजित पवार महिलांच्या समस्या, अडचणी समजून घेणार आहेतच शिवाय लाडकी बहिण योजना, तीन सिलेंडर मोफत, विद्यार्थिनींना मोफत शिक्षण याबाबतही माहिती देऊन त्यांचे याबाबत मत जाणून घेऊन सरकारच्या माध्यमातून त्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

६४ वर्षाच्या महाराष्ट्राच्या या राजकीय आणि सामाजिक प्रवासात शिव – शाहू – फुले – आंबेडकरांच्या या महाराष्ट्राने वेगवेगळे अर्थसंकल्प मांडलेले पाहिले… अनुभवले. कृषीप्रधान असलेल्या महाराष्ट्रात कृषीला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न झाले. परंतु ज्या कारणासाठी वैचारिक संघर्ष महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी दिला त्या महिलांसाठी अभिनव योजना अजित पवार यांनी यावेळी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रात दिली. त्या लाडक्या बहिण योजनेचे भव्य स्वागत महाराष्ट्रातील महिला भगिनींनी केल्याचेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

या दौऱ्यात अजित पवार यांच्यासोबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, कृषीमंत्री धनंजय मुंडे हे सहभागी होणार आहेत.

या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या मान्यतेने यावेळी राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते पदी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची तर प्रदेश प्रवक्ते पदी आमदार राजेश विटेकर यांची निवड केल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली.

या पत्रकार परिषदेला कृषीमंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आमदार राजेश विटेकर उपस्थित होते.

About Editor

Check Also

अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण विरोधात विधान भवनावर मोर्चा २७ आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; 'बदर समिती'चा अहवाल रद्द करण्याची मागणी

अनुसूचित जाती (एससी) आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *