अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केले स्वागत

मुंबईः प्रतिनिधी
नवी मुंबईमधील अल्पसंख्यांक समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफार मलिक, नसीम सिद्दीकी उपस्थित होते. प्रवेश झाल्यानंतर सुलतान मालदार यांना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश सचिव पद देण्यात आले.
नवी मुंबईमधील सुलतान अकबर मालदार यांच्यासह कुरेश सिद्दीकी, बिलाल सरगुरो, राशीद खान, अबु वैस मिर्जा, मुदस्सीर शेख, साकीब सैय्यद, जैद अमीन शेख, मौलाना इरशाद, जुबेर शेख, नाजीम शमसी, शेहजाद आलम कासमी आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेवून जाणारा पक्ष आहे. प्रत्येक समाजाला इथे न्याय दिला जातो त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहोत अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली.

About Editor

Check Also

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारणार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टोयोटा किर्लोस्कर मोटरसोबत महामंडळाचा सामंजस्य करार

महाराष्ट्रातील लाखो महिला प्रवाशांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र राज्य मार्ग …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *