अजित पवार म्हणाले, ठीक आहे तो रोहित बघतो घरी गेल्यावर आजीला सारखं सारखं माई माई करत होता...

राज्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांचे मेव्हणे स्व. एन डी पाटील यांच्या नव्याने बांधलेले संशोधन केंद्र आणि बहुद्देशिय सभागृहाचा उद्घाटन सोहळा आज सांगलीत पार पडला. या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, आमदार रोहित पवार, कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. या अजित पवार यांनी बोलताना रोहित पवार यांना मिश्किल टोला लगावला. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी हास्याची लकेर उमटली.

स्व. एन डी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ज्येष्ठ भगिनी आणि अजित पवार यांच्या आत्या आहेत. अजित पवार हे त्यांच्या आत्या बद्दल बोलताना काहीसे भावूक झाले होते.

अजित पवार आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, मी जन्माला आलो तसा आत्याला माई आत्या म्हणत आलो आहे. त्यामुळे मी आज माईसाहेब, सरोज पाटील आणि माई वगैरे काही बोलणार नाही. मी मघाशी बघत होतो. तो रोहित सारखा माई माई करत होता. वास्तविक त्या त्याच्या आजी आहेत तरी माई माई करतोय, ठिक आहे, बघतो घरी गेल्यावर काय आहे ते.

रोहित पवार यांच्या भाषणातील एका मुद्याचा संदर्भ देत अजित पवार यांनी रोहित पवार चिमटाही काढला. मी एन डी पाटील यांच्या संस्थेसाठी ४० लाख रूपयांचा निधी देत आहे. या निधीवर शून्य वाढवून चंद्रकांत पाटील यांनी निधी द्यावा असेही रोहित पवार म्हणाले होते. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, बरं झालं रोहितने आमचं नाव घेऊन शून्य वाढवायला सांगितले नाही.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, मी रोहितचे भाषण ऐकत होतो, खूप चुरूचुरू बोलायला लागला आहे. १९९० साली मी, जयंत पाटील आणि आर आर पाटील पहिल्यांदा आमदार म्हणून निवडूण आलो. १९९०, १९९५ आणि १९९९ असे तीन टर्म लोगोपाठ निवडूण आलो. १९९९ च्या आघाडी सरकारच्या काळात आम्हाला स्पेस मिळाली नाही. २००४ साली थोडी संधी मिळाली. पण हल्ली काही जणांना पहिल्या टर्मलाच भाषणबाजी करायची असते मी म्हणजे कुणीतरी मोठा अशा आर्विभावात ते दुसऱ्या पक्षालाही सल्ले देत फिरतात असा उपरोधिक टोलाही लगावला.
दोन-तीन दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या पक्षात कोकणातील नेत्याचेच चालत असून अजित पवार यांचे नियंत्रण पक्षावर राहिले नाही अशी टीका केली होती. त्या वक्तव्याचा धागा लक्षात ठेवून अजित पवार यांनी रोहित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

शेवटी बोलताना अजित पवार म्हणाले की, एन डी पाटील यांना आम्ही लहानपणापासून मामा म्हणत होतो. एन डी मामांनी आयुष्यभर विचारांची कास धरली. मी लहान असताना आम्हाला मुंबईला जायला एकच घर होतं. ते म्हणजे पुर्वीचे विर्लेपार्ले पूर्व येथील मामांचे घर. माझ्या वडीलांनी त्यांच्या घराचा पत्ता तोंड पाठ करायला लावला होता. चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलताना ते म्हणाले, मी गिरणी कामगाराचा मुलगा छोट्या घरात राहायचो. आम्हीही मुंबईत गेल्यावर दोन खोल्यांच्या घरात रहात होता. त्यामुळे आम्हीही सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही. आता नंतर रोहितच्या वेळेस परिस्थिती बदलली त्यांच्या खोलात जात नाही असेही शेवटी सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *