महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची विधानसभेची शिफारस विधानसभेत एकमुखी मागणी ठरावः जयकुमार रावल यांनी मांडला ठराव

मागील अनेक वर्षापासून स्त्री शिक्षणाचे उद्गाते आणि पहिली मुलींची शाळा आणि शाळेच्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात यावी अशी मागणी सातत्याने राज्यातील सर्वच स्थरातून करण्यात येत होती. तसेच राज्यातील महायुती सरकारनेही यासंदर्भात राज्यातील जनतेला आश्वासन दिले जात होते. अखेर यासंदर्भात आज विधानसभेत भाजपाचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी यासंदर्भातील ठराव मांडला. त्यास सर्वांनी एकमुखी पाठिंबा दिला.

क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा ठराव पणन मंत्री जयकुमार रावल यांनी  विधानसभेत मांडला.

क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी उपेक्षित, वंचितांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करत, सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्ची घालून, अस्पृश्यता निवारण आणि स्त्री शिक्षणासाठी संघर्ष केला आहे. त्यामुळे क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना “भारतरत्न” या सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्याच्या प्रयोजनार्थ हा ठराव मांडण्यात आला.

ठराव मांडताना मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून राजकारण, कला, साहित्य आणि विज्ञान क्षेत्रातील विचारवंत, शास्त्रज्ञ, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवक यांना या पुरस्काराने गौरवण्यात येते. क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना “भारतरत्न” या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याची शिफारस केंद्र शासनाकडे करण्यात येणार असल्याचे सभागृहात सांगितले.

त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्यात येत आहे असे जाहिर केले.

About Editor

Check Also

प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती भवनातील ‘अॅट होम’ सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील चार जणांना आमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडून निमंत्रण

भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठित ‘अॅट होम’ स्वागत समारंभासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *