अतुल लोंढे यांचा सवाल, संचालकांवरील कारवाईचे स्वागत, पण नितीन गडकरींवर कारवाई कधी?

भारतीय जनता पक्षाचे नागपूर मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केल्याच्या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने NSVM फुलवारी शाळेच्या संचालकावर कारवाई करण्याचे निर्देश दिले, त्याचे स्वागतच आहे. परंतु नितीन गडकरी यांच्यावर कारवाई केलेली नाही. शाळा संचालकांना दोषी ठरवून कारवाई होत असताना नितीन गडकरी यांच्यावर कारवाई कधी करणार? असा सवाल प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.

यासंदर्भात माहिती देताना अतुल लोंढे म्हणाले की, १ एप्रिल २०२४ रोजी NSVM फुलवारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान वैशाली नगर भागात भाजपा उमेदवार नितीन गडकरींच्या प्रचार रॅलीत सहभागी केले होते. शाळकरी मुलांना राजकीय प्रचारासाठी वापरणे हे चुकीचे व अत्यंत गंभीर आहे. निवडणुकीसंदर्भातील कार्यक्रमात लहान मुलांचा वापर करु नये असे निवडणुक आयोगाचे स्पष्ट निर्देश असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

अतुल लोंढे पुढे बोलताना म्हणाले की, या प्रकरणी ३ एप्रिल २०२४ रोजी राज्य निवडणूक अधिकारी यांना पत्र लिहून काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रवक्ता या नात्याने तक्रार दाखल केली होती, या तक्रारीची दखल घेऊन शाळा संचालकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत ही स्वागतार्ह बाब आहे पण शाळकरी मुलांना प्रचारासाठी बोलावणारे व त्यासाठी शाळेवर दबाव टाकणा-या नितीन गडकरी आणि भाजपावर काहीही कारवाई केलेली नाही. या प्रकरणात नितीन गडकरी आणि शाळेचे संचालक दोघेही दोषी आहेत त्यामुळे नितीन गडकरींवरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.

About Editor

Check Also

टीईटी TET पेपरफुटी विरोधात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यासमोर युवक काँग्रेसचे आंदोलन मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी फडकावले ‘दादा भुसे राजीनामा द्या’ पोस्टर; ‘पेपरचोर गद्दीछोड’च्या घोषणांनी परिसर दणाणला

राज्यातील टीईची TET परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनेविरोधात आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *